एक्स्प्लोर
Health Tips : लाल कांद्याबरोबरच सफेद कांदाही आहे आरोग्यासाठी गुणकारी; पाहा फायदे

White Onion
1/7

पांढरा कांदा (कांद्याची पात) शरीरासाठी देखील खूप फायदेशीर आहे. पांढऱ्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि अनेक आवश्यक घटक आढळतात. हे अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
2/7

संसर्ग दूर ठेवा : कांद्याच्या पातीचा वापर संसर्गापासून दूर ठेवतो. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे संक्रमण बरे करण्यास मदत करतात. कांद्याची पात त्याच्या प्रतिजैविक गुणधर्मांमुळे डोळे, नाक आणि कान संक्रमणांवर उपचार करतो.
3/7

कॅन्सरपासून बचाव : कांद्यामध्ये अँथोसायनिन आणि क्वेर्सेटिन नावाचे अँटी-ऑक्सिडंट असतात जे कॅन्सरपासून बचाव करतात. त्याच वेळी, कांद्याच्या पातीमध्ये सल्फर आणि फ्लेव्होनॉइड अँटी-ऑक्सिडंट आढळतात जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.
4/7

श्वसनाच्या रुग्णांसाठी फायदेशीर : कांद्याची पात दाहक-विरोधी आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामुळे सूज कमी होते. पांढऱ्या कांद्याचा रस आणि मध एकत्र प्यायल्याने कफ सिरपचे काम होते. छातीवर लावल्याने श्वसनाचे आजार बरे होतात.
5/7

अॅसिडिटीपासून आराम : कांद्याची पात खाल्ल्याने अॅसिडिटीमध्येही आराम मिळतो. पांढऱ्या कांद्याचा समावेश अल्कधर्मी अन्नामध्ये होतो जो शरीरातील आम्ल संतुलित करण्याचे काम करतो. गॅसच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी याचे सेवन अवश्य करावे.
6/7

केस निरोगी करण्यासाठी : केसांना लावण्यासाठीही कांद्याच्या पातीचा वापर केला जातो. कांद्याचा रस लावल्याने केस फुटणे, पांढरे होणे किंवा टाळूशी संबंधित समस्या दूर होतात. अशा परिस्थितीत पांढरा कांदा केसांच्या वाढीसाठी चांगला आहे. त्याचा रस डोक्याला लावल्याने केस गळण्याची समस्या कमी होते.
7/7

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 15 Jul 2022 07:58 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
