आजच्या घाईगडबडीच्या जीवनात ताजे अन्न खाणे शक्य नाही. बहुतेक काम करणारे लोक वेळ वाचवण्यासाठी फ्रीजमध्ये बनवलेले अन्न साठवतात. मात्र फ्रिजमध्ये बराच काळ ठेवलेले हे अन्न तुमचे आरोग्यही खराब करू शकते. फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न आपण किती तासांनंतरही खाऊ शकतो आणि कोणता पदार्थ किती वेळ फ्रीजमध्ये ठेवून आपण वापरू शकतो हे आज जाणून घेऊया.
2/6
फ्रिजमध्ये ठेवलेला भात 2 दिवसात खाऊन घ्यावा, अन्यथा तो खराब होतो. फ्रिजमध्ये ठेवलेला भात खाण्यापूर्वी चांगला गरम करुन घ्या आणि त्यानंतरच खा.
3/6
जर तुम्ही गव्हाची चपाती फ्रीजमध्ये ठेवत असाल तर चपाती बनवल्यानंतर 12 ते 14 तासांच्या आत खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. जर चपाती वेळेत खाल्ली नाही तर त्यातील पोषणतत्वे नष्ट होतात. तसेच ती चपाती तुमच्या पोटदुखीचे कारण बनू शकते.
4/6
जर जेवणातील डाळ शिल्लक राहिली तर तर तुम्ही ती फ्रिजमध्ये ठेवू शकता. आणि डाळ फ्रीज ठेवली असेल तर तुम्ही ती डाळ 2 दिवसांच्या आत खावी. कारण फ्रिजमध्ये 2 दिवसांपेक्षा जास्त काळ ठेवलेली डाळ खाल्ल्याने पोटात गॅस होऊ शकतो.
5/6
कधीकधी आपण कापलेली फळे उरली तर ती फळे आपण फ्रीजमध्ये ठेवतो. पण ही फळे 4 तासांच्या आत खावीत कारण त्या नंतर ती फळं खराब होऊ शकतात.
6/6
केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातून इथिलीन गॅस सोडला जातो. ज्यामुळे फ्रिजमध्ये असलेले इतर फळे देखील लवकर पिकतात. म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये किंवा इतर