एक्स्प्लोर
World Immunization Week 2024 : प्रौढांसाठी काही आवश्यक लसी, ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो!
इन्फ्लूएंझा (फ्लू), न्यूमोकोकल रोग असे काही आजार प्रौढांमध्ये खूप सामान्य आहेत. आज आपण प्रौढांसाठी आवश्यक लसींबद्दल जाणून घेणार आहोत!
![इन्फ्लूएंझा (फ्लू), न्यूमोकोकल रोग असे काही आजार प्रौढांमध्ये खूप सामान्य आहेत. आज आपण प्रौढांसाठी आवश्यक लसींबद्दल जाणून घेणार आहोत!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/d89fffad454ab4663431874fcf4876c01714377398499737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा जागतिक लसीकरण सप्ताह म्हणून साजरा केला जातो. ज्याचा उद्देश लोकांना लसीकरणाचे महत्त्व सांगणे हा आहे. लस आपल्याला अनेक प्राणघातक आजारांपासून वाचवते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याची गरज मुलांनाच नाही तर प्रौढांनाही असते. प्रौढांसाठी आवश्यक लसीबद्दल जाणून घ्या.(Photo Credit : pexels )
1/8
![जगभरातील लाखो प्रौढ लोक दरवर्षी गंभीर आजारी पडतात आणि यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. अनेकदा असे आजार होतात ज्यांना लसीकरणाने सहज रोखता आले असते, पण अजूनही लोक लसीकरणाबाबत फारसे जागरूक नाहीत. त्यांना वाटते की लसीकरण फक्त लहान मुलांसाठी महत्वाचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जातो.(Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/5e822c60b4a80acffaeaa578e7fd1c17be526.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जगभरातील लाखो प्रौढ लोक दरवर्षी गंभीर आजारी पडतात आणि यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. अनेकदा असे आजार होतात ज्यांना लसीकरणाने सहज रोखता आले असते, पण अजूनही लोक लसीकरणाबाबत फारसे जागरूक नाहीत. त्यांना वाटते की लसीकरण फक्त लहान मुलांसाठी महत्वाचे आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक लसीकरण सप्ताह साजरा केला जातो.(Photo Credit : pexels )
2/8
![प्रौढांसाठी लसीकरण देखील महत्वाचे आहे कारण 25 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू संसर्गजन्य रोगांमुळे होतात. प्रौढांना त्यांचे वय, जीवनशैली, नोकरी, आरोग्याची स्थिती किंवा सहलीमुळे नवीन आणि अनेक आजारांचा धोका असू शकतो. इन्फ्लूएंझा (फ्लू), न्यूमोकोकल रोग असे काही आजार प्रौढांमध्ये खूप सामान्य आहेत. आज आपण प्रौढांसाठी आवश्यक लसींबद्दल जाणून घेणार आहोत.(Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/70b39216b609e0d9b6838c4506ae32f7d29c7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रौढांसाठी लसीकरण देखील महत्वाचे आहे कारण 25 टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू संसर्गजन्य रोगांमुळे होतात. प्रौढांना त्यांचे वय, जीवनशैली, नोकरी, आरोग्याची स्थिती किंवा सहलीमुळे नवीन आणि अनेक आजारांचा धोका असू शकतो. इन्फ्लूएंझा (फ्लू), न्यूमोकोकल रोग असे काही आजार प्रौढांमध्ये खूप सामान्य आहेत. आज आपण प्रौढांसाठी आवश्यक लसींबद्दल जाणून घेणार आहोत.(Photo Credit : pexels )
3/8
![प्रौढांनी फ्लूची लस घेणे आवश्यक आहे कारण ते बऱ्याच गंभीर आजारांपासून संरक्षण करण्याचे कार्य करते. यामुळे मधुमेह, फुफ्फुसाचे आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/7f5ebb5556177873a2d8b6ca70f3e296a1a59.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रौढांनी फ्लूची लस घेणे आवश्यक आहे कारण ते बऱ्याच गंभीर आजारांपासून संरक्षण करण्याचे कार्य करते. यामुळे मधुमेह, फुफ्फुसाचे आजार आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही कमी होते. (Photo Credit : pexels )
4/8
![न्यूमोकोकल लस न्यूमोनिया आणि मेंदूज्वर यासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. तज्ञ 65 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना हे करण्याचा सल्ला देतात. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/489f022d6a25dfff2b2265d94229dd8572cce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
न्यूमोकोकल लस न्यूमोनिया आणि मेंदूज्वर यासारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. तज्ञ 65 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना हे करण्याचा सल्ला देतात. (Photo Credit : pexels )
5/8
![हिपॅटायटीस बी हा एक गंभीर आजार आहे. या आजारावर कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. हिपॅटायटीस बी मुळे सिरोसिस आणि यकृत कर्करोग देखील होऊ शकतो. त्यामुळे लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/f7e40c068e3cbe419ee83552f1f492cde4f8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिपॅटायटीस बी हा एक गंभीर आजार आहे. या आजारावर कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. हिपॅटायटीस बी मुळे सिरोसिस आणि यकृत कर्करोग देखील होऊ शकतो. त्यामुळे लस घेणं अत्यंत गरजेचं आहे. (Photo Credit : pexels )
6/8
![सर्वाइकल कैंसर ज्या लसीपासून संरक्षण होते त्याला एचपीव्ही लस म्हणतात. एचपीव्ही लस एचपीव्हीमुळे होणारे तोंड, घसा, डोके आणि मानेच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करते.(Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/9b0e6cb4e654b22ec7179812a66ad0148c2b5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वाइकल कैंसर ज्या लसीपासून संरक्षण होते त्याला एचपीव्ही लस म्हणतात. एचपीव्ही लस एचपीव्हीमुळे होणारे तोंड, घसा, डोके आणि मानेच्या कर्करोगापासून देखील संरक्षण करते.(Photo Credit : pexels )
7/8
![पेर्टुसिसपासून बचाव करण्यासाठी सर्व प्रौढांना टीडीएपी लस मिळणे आवश्यक आहे. याशिवाय गरोदर महिलांसाठीही ही लस खूप महत्त्वाची आहे, कारण त्यांना होणारा कोणताही संसर्ग बाळाला धोका निर्माण करू शकतो. लसीकरणामुळे संसर्ग पसरण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. (Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/b12a3d697fe422780e965428937493c596f26.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पेर्टुसिसपासून बचाव करण्यासाठी सर्व प्रौढांना टीडीएपी लस मिळणे आवश्यक आहे. याशिवाय गरोदर महिलांसाठीही ही लस खूप महत्त्वाची आहे, कारण त्यांना होणारा कोणताही संसर्ग बाळाला धोका निर्माण करू शकतो. लसीकरणामुळे संसर्ग पसरण्याचा धोका बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. (Photo Credit : pexels )
8/8
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/29/7e30ad4d9d43e3c494e6680cec9d30e3be79b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )
Published at : 29 Apr 2024 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)