एक्स्प्लोर
Coconut Oil For Hair Fall: जाणून घेऊया नारळाचे तेल कसे लावावे आणि त्याचे फायदे काय आहेत?
केस गळणे टाळण्यासाठी खोबरेल तेल वापरणे खूप फायदेशीर आहे. हे तेल लावण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत असली पाहिजे.
Coconut Oil For Hair Fall
1/8

आजकाल बहुतेक लोक केस गळतीमुळे त्रस्त असतात. खराब जीवनशैली, शरीरातील पोषणाचा अभाव, रासायनिक सौंदर्य उत्पादने आणि प्रदूषित वातावरण यामुळे केस गळतात. केसगळती वेळीच थांबवली नाही तर टक्कल पडण्याची शक्यता असते.
2/8

खोबरेल तेलाचा वापर करून आपण केस गळणे थांबवू शकतो आणि टक्कल पडणे टाळू शकतो.
3/8

तुरटी मिसळून खोबरेल तेल लावल्याने खूप फायदा होतो. केसगळती थांबवायची असेल तर खोबरेल तेल गरम करून त्यात तुरटी टाकून या तेलाने केसांना मसाज करा. केस धुण्यापूर्वी हे तेल लावा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा. या रेसिपीने केसांना अनेक फायदे होतील.
4/8

खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने केसांना पोषण मिळते. खोबरेल तेलामध्ये असलेले लॉरिक अॅसिड केस गळणे थांबवते. हे केसांना मॉइश्चरायझिंग करून ते मजबूत करून कार्य करते.
5/8

या तेलामध्ये असलेले अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म बॅक्टेरियांना केसांपासून दूर ठेवतात. हे केसांच्या मुळांपासून कोंडा आणि घाण काढून टाकण्याचे काम करते. यामुळे केसांना ताकद मिळते.
6/8

नारळाच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे केस मुळापासून मजबूत होतात.
7/8

खोबरेल तेल केसांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. यामध्ये असलेले पोषक घटक कोरडेपणा दूर करतात आणि त्यांना चमकदार बनवतात.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. ( फोटो सौजन्य:unsplash.com)
Published at : 24 Jan 2023 03:20 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट























