एक्स्प्लोर
Health Tips : तरुण वयात स्ट्रोकचा वाढता धोका, तणाव आणि प्रदूषण ठरतंय कारण?
Reason of Stroke at Young Age : एका अभ्यासानुसार, 45 किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये स्ट्रोक येण्याचं प्रमाण 10 ते 14 टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे ही गंभीर चिंतेची बाब आहे.

Increased risk of stroke at a young age
1/11

एक काळ असा होता की, पक्षाघाताची समस्या वृद्धांमध्या जास्त दिसायची. पण, गेल्या काही वर्षांत पक्षाघात तरुणांनाच बळी बनवत आहे. हा देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे. (Image Source : istock)
2/11

हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोग ज्यामध्ये लिपिड विकार, लठ्ठपणा, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान आणि शारीरिक निष्क्रियता अशा लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका सुमारे 50 टक्क्यांनी वाढतो. (Image Source : istock)
3/11

स्ट्रोक येण्यामागे तणावही एक कारण असल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे. तणावामुळे स्ट्रोक कसा होतो, याबाबत जाणून घ्या. (Image Source : istock)
4/11

दीर्घकाळ तीव्र मानसिक तणावामुळे संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम होतो. न्यूरोएंडोक्राइन फंक्शनमध्ये समस्या निर्माण होऊन त्यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. शरीरात विविध ठिकाणी सूज येणे. रक्ताभिसरणाचा स्फोट होणे किंवा बिघडणे, रक्ताभिसरणात कॅल्शियम जमा होणे, अशा समस्या उद्भवतात. (Image Source : istock)
5/11

प्रदूषित हवाही स्ट्रोकचं कारण ठरु शकते. आपल्या सभोवतालच्या हवेमध्ये नॅनोकण, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साइड, ग्राउंड लेव्हल ओझोन आणि नायट्रोजन डायऑक्साइड असतात. (Image Source : istock)
6/11

जेव्हा प्रदूषित हवेत श्वास घेतो तेव्हा लहान कण आपल्या फुफ्फुसात शिरतात आणि आपल्या शरीरात पसरतात. याचा आपल्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. (Image Source : istock)
7/11

प्रदूषित हवेतील काही अत्यंत लहान कण फुफ्फुसातून रक्ताभिसरणात प्रवेश करतात आणि मेंदूपर्यंत रक्त पोहोचण्यास अडचण निर्माण करतात. यामुळे स्ट्रोक येण्याचा धोका असतो. (Image Source : istock)
8/11

तरुणांमध्ये स्ट्रोकची लक्षणे ओळखणं महत्त्वाचं आहे. यामुळे प्राथमिक उपचारात मदत होते. चेहऱ्यावरील कमजोरीकडे दुर्लक्ष करु नका. यामध्ये चेहराच्या एका बाजूला अचानक झुकणे किंवा हसताना चेहऱ्यात बदल दिसून येतो. (Image Source : istock)
9/11

अचानक बोलण्यात अडचण येणे किंवा शब्द नीट उच्चारता न येणे. स्पष्ट न दिसणे. अंगात अशक्तपणा, हातपाय हलवण्यात अडचण, विशेषतः हात हलवताना समस्या निर्माण होणे, अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका. (Image Source : istock)
10/11

काही प्रकरणांमध्ये, स्ट्रोकच्या एक आठवड्यापूर्वी काही लक्षणे चिन्हे दिसतात. यामध्ये चक्कर येणे, छातीत दुखणे आणि धाप लागणे किंवा श्वासोच्छवास घेण्यात अडतण येणे, या लक्षणांचा समावेश आहे. (Image Source : istock)
11/11

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (Image Source : istock)
Published at : 21 Nov 2023 10:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
