एक्स्प्लोर
Stale Food : थांबा! शिळे अन्न खाताय? तर याचे शरीरावर होणारे परिणाम जाणून घ्या!
Stale Food : जास्त शिळे अन्न खात असला तर त्याचे शरिरावर होणारे परिमाण जाणून घ्या...

Health Tips
1/10

महिलांना शिळे अन्न खाण्याची खुप सवय असते. रात्रीचा शिळा भात, खिचडी या सारखे पदार्थ महिला आवडीने खातात (Photo Credit : Unsplash)
2/10

तुम्ही ही अति प्रमाणात शिळे अन्न खात असाल तर वेळीच त्याचे प्रमाण कमी करा.याचे तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात (Photo Credit : Unsplash)
3/10

कुटुंबातील सदस्यांना रुचकर जेवण खाऊ घालताना बहुतांश वेळा महिला वर्गाकडून उरलेले, शिळे अन्न स्वतः खाल्ले जाते. परंतु, यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची माहिती समोर येतेय. (Photo Credit : Unsplash)
4/10

उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होत असल्याने केवळ ताजे आणि पौष्टिक अन्न खावे, असा सल्ला आहार तज्ज्ञांकडून दिला जातो.(Photo Credit : Unsplash)
5/10

घरातील सदस्यांच्या आवडी-निवडी जोपासताना निरनिराळे खाद्यपदार्थ बनवून खाऊ घालण्यात गृहिणींची दमछाक होत असते.पण, एरवी प्रत्येकाची आवड जपणाऱ्या महिलांकडून स्वत:च्या आहाराकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असते.(Photo Credit : Unsplash)
6/10

शिल्लक राहिलेले अन्न फेकले जाऊ नये किंवा त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जवळपास सर्वच महिला दररोज शिळे अन्न खातात.(Photo Credit : Unsplash)
7/10

शिळे व पौष्टिक नसलेले अन्न खाल्ल्याने आरोग्यावर सौम्य ते गंभीर परिणाम होतो. (Photo Credit : Unsplash)
8/10

जळजळ होण्यापासून तर वात-पित्ताचे विकार, पोटाचे आजार यांसह विषबाधा होण्याची भीती असते.(Photo Credit : Unsplash)
9/10

शिळे अन्न खाल्ल्याने आळसही वाढू शकतो. शरीराला हवे असलेले पोषक तत्त्व नष्ट झालेले असल्याने, असे अन्न आरोग्यास अपायकारक ठरू शकते.(Photo Credit : Unsplash)
10/10

शक्य असेल तेवढ्या कमी प्रमाणात शिळे अन्न खावे. तसेच महिला वर्गाने शिळे अन्न उरणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. (Photo Credit : Unsplash)
Published at : 11 Nov 2023 05:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
