स्काल्पमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे कोंडा होण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय टाळूच्या कोरडेपणामुळे कोंड्याची समस्या होऊ शकते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. चला जाणून घेऊया कोंड्याच्या समस्येवर कशी मात करता येईल.
2/7
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी नेहमी चांगला शॅम्पू निवडा. जास्त केमिकलयुक्त शैम्पू वापरू नका. त्यामुळे कोंडा वाढण्याची शक्यता आहे. (Photo - Freepik)
3/7
लिंबाचा रस केसांच्या त्वचेला (स्काल्पला) लावल्यानं कोंड्याची समस्या दूर होते. लक्षात ठेवा की, लिंबू थेट केसांना लावू नका. ऑलिव्ह तेल, जोजोबा तेल, खोबरेल तेल इत्यादी लिंबाच्या रसात एकत्र करा आणि लावा. (Photo - Freepik)
4/7
कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी बेसन केसांना लावा. यासाठी 1 चमचे बेसन घेऊन त्यात थोडं पाणी घालून चांगलं एकत्र करा. आता हे मिश्रण स्काल्पला लावा. त्यानंतर केस साध्या पाण्यानं धुवा. यामुळे कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. (Photo - Freepik)
5/7
केसांसाठी नियमितपणे खोबरेल तेलाचा वापर केल्यास कोंड्याच्या समस्येवर मात करता येते. (Photo - Freepik)
6/7
केसांना दही लावल्यानं कोंड्याची समस्याही कमी होते. यासोबतच संसर्गाची समस्याही कमी होते. (Photo - Freepik)
7/7
कोरफडीचे जेल स्काप्लला लावल्यानं कोंड्याची समस्या कमी होऊ शकते. (Photo - Freepik)