एक्स्प्लोर
Skin Care Tips : चेहऱ्यापेक्षा पाय अधिक ग्लो करतील; फक्त घरबसल्या 'हे' उपाय करून पाहा
Skin Care Tips : नियमितपणे आपले पाय सॉफ्ट ठेवायचे असतील तर तुमचे पाय कोमट पाण्याने स्वच्छ करा.

Skin Care Tips
1/9

तुम्ही तुमच्या पायांची टॅनिंग दूर करू शकता. आणि तुमच्या पायांना चेहऱ्यापेक्षा अधिक मुलायम आणि तजेलदार बनवू शकता.
2/9

नियमितपणे आपले पाय सॉफ्ट ठेवायचे असतील तर तुमचे पाय कोमट पाण्याने स्वच्छ करा. पायांची त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी आणि त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी सॉफ्ट स्क्रब वापरा.
3/9

लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा: लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा समान प्रमाणात घेऊन पेस्ट बनवा. ही पेस्ट टॅन झालेल्या पायांवर लावा, काही मिनिटे राहू द्या आणि नंतर धुवा.
4/9

हळद आणि दही मास्क: पायांवर हळद आणि दह्याचा मास्कसुद्धा फार गुणकारी आहे. हा मास्क 10 ते 15 मिनिटे आपल्या पायांवर लावा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल.
5/9

कोरफड जेल: पायांना ताजे कोरफड जेल लावा. कोरफडीमुळे पाय मऊ होतात आणि त्वचा उजळते.
6/9

काकडीचे तुकडे: काकडीचे काप तुमच्या टॅन झालेल्या पायांवर 10-15 मिनिटे ठेवा किंवा त्याचा रस पायाला लावा. काकडी त्वचा सुधारण्यास मदत करू शकते.
7/9

सनस्क्रीन लावा: जर तुमचे पाय सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतील तर त्यांच्यावर चांगला SPFअसलेले सनस्क्रीन लावा.
8/9

नियमितपणे मॉइश्चरायझ करा: तुमची त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चांगले मॉइश्चरायझर लावा. यामुळे कोरडी त्वचा आणि वाढता काळोख टाळता येतो.
9/9

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Published at : 06 Oct 2023 07:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
