एक्स्प्लोर
Advertisement

Cashew : भारतातील 'या' शहरांत कांद्या-बटाट्याच्या दरात विकतात काजू
Cashew : भारतातील या ठिकाणी कांदा आणि बटाट्याच्या दराने काजू विकले जातात. त्यामुळे या शहरात पर्यटकांची ये-जा वाढली आहे.

Cashew
1/9

ड्रायफ्रूट्समधील काजू (Cashew) आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. काजू हे ड्रायफ्रूट जवळपास सगळ्यांनाच आवडते. मात्र, हे काजू खरेदी करताना 800 ते 1000 रुपये प्रति किलो दराने विकले जातात. यामुळेच अनेकांना काजू खाणं परवडत नाही. पण, तुम्हाला माहित आहे का भारतातीलच एका शहरात अगदी कमी किंमतीत काजू विकले जातात.
2/9

हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण, भारतीय बाजारपेठेत 800 ते 1000 रुपये किलोने विकले जाणारे काजू या शहरात केवळ 30 ते 50 रुपये किलोने विकले जातात.
3/9

झारखंड राज्यातील जामतारा जिल्ह्यात काजू बटाटे, कांदे आणि इतर भाज्यांइतक्याच किंमतीत मिळतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, इतके स्वस्त काजू मिळण्यामागे नेमकं कारण काय? तर, यामागचं कारण असं आहे की, झारखंडमध्ये दरवर्षी हजारो टन काजूचं उत्पादन होतं.
4/9

जामतारा जिल्हा मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर सुमारे 49 एकर विस्तीर्ण शेतजमिनीवर काजूची लागवड केली जाते. येथे सुक्या मेव्याच्या मोठ्या बागा आहेत. येथे काम करणारे लोक हे सुका मेवा अत्यंत स्वस्त दरात विकतात.
5/9

आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे असतानाही आपल्याला काजू महागात मिळतात. काजूच्या वाढत्या किमतीमुळे, शेतकरी मुख्यतः देशातील इतर राज्यांमध्ये देखील कोरड्या फळांची लागवड करू इच्छितात.
6/9

पण, जेव्हापासून या जिल्ह्यात लोकांना कळू लागलं आहे की, येथे कांदा आणि बटाट्याच्या दराने काजू विकले जातात तेव्हापासून या ठिकाणी पर्यटकांची ये-जा वाढली आहे.
7/9

शेतकऱ्यांकडे या शेतीसाठी फारशा मुलभूत सुविधा नसल्या तरी येथील शेतकरी घेत असलेल्या उत्पादनातून खूश आहेत. जामतारा येथील लोकांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी जामतारा येथील माजी उपायुक्तांनी ओडिशातील कृषी शास्त्रज्ञांकडून जमिनीची चाचणी घेतल्यानंतर येथे सुका मेव्याची लागवड सुरू केली होती.
8/9

काही वर्षांतच येथे काजूची चांगली वाढ होऊ लागली, परंतु सुरक्षा आणि देखरेखीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बरेचसे पीक एकतर चोरीला जाते किंवा मळ्यातील कामगार ते स्वस्त दरात विकू लागले.
9/9

कोकणात डिसेंबर ते एप्रिल दरम्यान काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कोकण हा काजूंसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे काजू परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात.
Published at : 30 Jan 2023 09:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
