एक्स्प्लोर
Breast Cancer Awareness Month 2023 : महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवणारे 'हे' आहेत 10 महत्वाचे घटक, पाहा
आजच्या जीवनशैलीमुळे कॅन्सर हा आजार होतो. आपल्या देशात लाखो लोकांना कॅन्सरमुळे जीव गमवावा लागतो. महिलांमध्ये सर्वाधिक धोका स्तनाचा कर्करोग आहे.
![आजच्या जीवनशैलीमुळे कॅन्सर हा आजार होतो. आपल्या देशात लाखो लोकांना कॅन्सरमुळे जीव गमवावा लागतो. महिलांमध्ये सर्वाधिक धोका स्तनाचा कर्करोग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/dacd0aa04cc0c58bf9be787c409403ba1696485214318766_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Breast Cancer Awareness Month 2023
1/10
![ऑक्टोबर महिना जगभरात 'स्तन कर्करोग जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात स्तनाच्या कर्करोगाविषयी महिलांना जागरूक केले जाते. जेणेकरून महिलांना वेळेत स्तनाच्या कर्करोगावर उपचार सुरू करून त्यांचे प्राण वाचवता येतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/b5ea1ab91d9ddee3b2891186495047ae91255.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑक्टोबर महिना जगभरात 'स्तन कर्करोग जागरूकता महिना' म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात स्तनाच्या कर्करोगाविषयी महिलांना जागरूक केले जाते. जेणेकरून महिलांना वेळेत स्तनाच्या कर्करोगावर उपचार सुरू करून त्यांचे प्राण वाचवता येतील.
2/10
![स्तन कर्करोग होण्याची बरीच कारणे आहेत.निरोगी जीवनशैली निवडून, आपण या गंभीर आजारापासून मोठ्या प्रमाणात स्वतःचे संरक्षण करू शकता. स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढवणारे काही इतर जोखीम घटक काय आहेत हे जाणून घेऊयात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/0de30c0f7286f3f89de8324492739da78042f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्तन कर्करोग होण्याची बरीच कारणे आहेत.निरोगी जीवनशैली निवडून, आपण या गंभीर आजारापासून मोठ्या प्रमाणात स्वतःचे संरक्षण करू शकता. स्तनाच्या कर्करोगाची शक्यता वाढवणारे काही इतर जोखीम घटक काय आहेत हे जाणून घेऊयात.
3/10
![वयाच्या पन्नास- पच्चावन नंतर स्तनाचा कर्करोग होण्याचा मोठा धोका असतो. लिंग हे देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/2982387de0c2a71ceca5db2f2ed171f44279b.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वयाच्या पन्नास- पच्चावन नंतर स्तनाचा कर्करोग होण्याचा मोठा धोका असतो. लिंग हे देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. हा आजार पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
4/10
![ज्या महिला रोज दारूचे सेवन करतात त्यांना देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. तर वजन खूप जास्त असेल , मधूमेह आणि हृदयविकार असेल तरीही स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/e0404579f2380dac8e5afac4341f4d7e6e7fd.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या महिला रोज दारूचे सेवन करतात त्यांना देखील स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. तर वजन खूप जास्त असेल , मधूमेह आणि हृदयविकार असेल तरीही स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
5/10
![ज्या स्त्रिया शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतात किंवा कमी हालचाल करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत तुम्ही रोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. वेगाने चालणे, धावणे, जॉगिंग इ. तुम्ही जेवढे शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल, तेवढे तुम्ही अधिक तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/0bc0aef7987d9cc28010ecbd10d57c99c68bb.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्या स्त्रिया शारीरिकदृष्ट्या सक्रिय नसतात किंवा कमी हालचाल करतात त्यांना स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत तुम्ही रोज व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. वेगाने चालणे, धावणे, जॉगिंग इ. तुम्ही जेवढे शारीरिकदृष्ट्या सक्रिय असाल, तेवढे तुम्ही अधिक तंदुरुस्त आणि निरोगी राहू शकता.
6/10
![काही वेळा वयाच्या 12 वर्षापूर्वी मासिक पाळी आणि 55 वर्षांनंतर रजोनिवृत्तीमुळे काही महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/2a5e419829f06ef8fa95eee67f8a533dd564f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही वेळा वयाच्या 12 वर्षापूर्वी मासिक पाळी आणि 55 वर्षांनंतर रजोनिवृत्तीमुळे काही महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
7/10
![आई झाल्यानंतर बाळाला स्तनपान न केल्यास स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते. अशा स्थितीत बाळाच्या जन्मानंतर 6 महिने स्तनपान करावे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/58461a643c7449728ea064cf6cc3fd4fccfa0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आई झाल्यानंतर बाळाला स्तनपान न केल्यास स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढू शकते. अशा स्थितीत बाळाच्या जन्मानंतर 6 महिने स्तनपान करावे.
8/10
![कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील एखाद्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल तर हा प्राणघातक आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/d32457b4a84c7f1999e112f6691b6e5adc6e2.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुटुंबातील रक्ताच्या नात्यातील एखाद्याला स्तनाचा कर्करोग झाला असेल तर हा प्राणघातक आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
9/10
![अनेक बर्थ कंट्रोल पद्धती देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.तर तुम्ही जर बर्थ कंट्रोल पिल्सचे नियमीत सेवन करत असाल तरीही तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/5b81b9ce7f4315fa3b62375ccfc9c3a485449.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक बर्थ कंट्रोल पद्धती देखील स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.तर तुम्ही जर बर्थ कंट्रोल पिल्सचे नियमीत सेवन करत असाल तरीही तुम्हाला स्तनाचा कर्करोग होऊ शकतो.
10/10
![स्तनाचा कर्करोग सुरुवातीला वेदनारहित असतो आणि त्यामुळे तो आढळून येत नाही. जर तुम्हाला स्तनामध्ये किंवा आजूबाजूला गाठ जाणवत असेल परंतु त्यात वेदना होत नसेल तर सावध व्हा आणि विलंब न करता डॉक्टरांकडे जा.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/05/d487a11253d7f8f1661b3ad2dacab90ef8636.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्तनाचा कर्करोग सुरुवातीला वेदनारहित असतो आणि त्यामुळे तो आढळून येत नाही. जर तुम्हाला स्तनामध्ये किंवा आजूबाजूला गाठ जाणवत असेल परंतु त्यात वेदना होत नसेल तर सावध व्हा आणि विलंब न करता डॉक्टरांकडे जा.
Published at : 05 Oct 2023 11:48 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)