एक्स्प्लोर
जेवणानंतर झोपणे टाळा; पचन, वजन आणि हृदयावर होतो परिणाम!
जेवणानंतर लगेच झोपल्यास पचन मंदावते, वजन वाढते, गॅस, अपचन आणि स्ट्रोक-इन्सुलिन प्रतिरोधाचा धोका वाढतो, त्यामुळे 2–3 तास चालणे आवश्यक आहे.
Health tips
1/9

जेवण केल्यानंतर लगेच झोपल्यास वजन वाढण्याची शक्यता असते. झोपेत अन्नाचे पचन होत नाही, त्यामुळे हळूहळू चरबी जमा होऊन वजन वाढू शकतं .
2/9

जेवणानंतर लगेच झोपल्यास स्ट्रोक होण्याची शक्यता वाढते. झोपेत असताना शरीर नीट काम करत नाही, त्यामुळे हृदयावर ताण येऊ शकतो. जेवणानंतर थोडा वेळ चालणे किंवा बसणे आरोग्यासाठी चांगले असते.
3/9

पोटातील अॅसिड अन्ननलिकेत गेल्याने जळजळ होते आणि यामुळे हृदय आणि रक्तावर परिणाम होतो.आपल्या पोटाला अन्न अगदी व्यवस्थित पचवण्यासाठी वेळ लागतो आणि जेवणानंतर लगेच झोपल्याने ही प्रक्रिया मंदावते.
4/9

यामुळे पोटात गॅस होऊ शकते आणि अपचनही होऊ शकते, ज्यामुळे शरीर अस्वस्थ आणि जड वाटते.
5/9

जेव्हा पचनक्रिया बिघडते तेव्हा गॅस, आणि मळमळ यासारख्या समस्या होऊ शकतात, या सर्वांचा तुमच्या एकूण पचनक्रियेच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
6/9

जेवणानंतर, विशेषत जास्त कार्बोहायड्रेट असलेले जेवण, तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते.
7/9

जर तुम्ही जेवून लगेच झोपलात, तर तुमचे शरीर अन्नातील ऊर्जा वापरू शकत नाही, त्यामुळे रक्तात साखर जास्त राहते.
8/9

यामुळे इन्सुलिन प्रतिरोध होऊ शकतो, जो टाइप 3 मधुमेहाचा पूर्वसूचक आहे.जेवणानंतर कमीतकमी 2-3 तास चालावे, जेणेकरून अन्न व्यवस्थित पचेल आणि शरीरातील उर्जेचा चांगला वापर होईल.
9/9

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 09 Oct 2025 02:45 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























