नुकतीच रिलिज झालेली मिर्झापूर 2 ही वेबसिरीज सध्या चर्चेत आहे. या सेकंड सिझनमध्ये केवळ बाहुबलींचाच नव्हे तर यातील महिला कलाकारांचा देखील जलवा पाहायला मिळतोय. आपल्या दमदार अभिनयाने या महिला कलाकारांनी मनं जिंकलीत. कोण आहेत या महिला कलाकार जाणून घेऊयात...
2/9
रसिका दुग्गल - 'कालीन भैया'ची पत्नी 'बीना'ची दमदार भूमिका साकारलीय रसिका दुग्गलने. रसिकाची भूमिका पहिल्या सिरिजपेक्षा या सेकंड सिरिजमध्ये अधिक दमदार झाली आहे. रसिकानं लूटकेस, मंटो या सिनेमांसह दिल्ली क्राइम, मेड इन हेवन या वेबसिरिजमध्येही काम केलं आहे.
3/9
श्वेता त्रिपाठी - श्वेताने ‘गोलू’ची भूमिका निभावली आहे. रसिकाप्रमाणंच गोलू देखील पहिल्या सिझनच्या तुलनेत या सिझनमध्ये दमदार दिसतेय. श्वेतानं याआधी मसान, रात अकेली है आणि हरामखोर अशा सिनेमात तसंच गॉन गेम, टीवीएफ ट्रिपलिंग अशा वेबसिरिजमध्येही काम केलं आहे.
4/9
इशा तलवार - इशाने या सिरिजमध्ये ‘माधुरी यादव त्रिपाठी’ ची भूमिका केलीय. जी कालीन भैयाला बाजूला सारुन स्वत: युपीची सीएम बनते. दुसऱ्या सिझनमध्ये माधुरीची एन्ट्री झालीय. तिनं याआधी ट्यूबलाइट, आर्टिकल 15सह अन्य काही सिनेमात काम केलंय.
5/9
शीबा चड्ढा - गुड्डू आणि बबलू पंडितच्या आईची भूमिका शीबाने केलीय. शीबा या सिरिजमध्ये आपली एक वेगळी छाप सोडताना दिसतात. शीबा इंडस्ट्रीमधील जुनं नाव आहे. गली ब्वॉय, दिल्ली 6, दिल से और बधाई हो अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलंय.
6/9
हर्षिता गौर - गुड्डू आणि बबलूची बहिण स्वीटी. हर्षिताने खूप चांगल्या पद्धतीनं ही भूमिका साकारलीय. छोटी भूमिका असली तरी तिनं उत्तम पद्धतीनं साकारलीय, जी लक्षात राहते. हर्षिता गौरनं याआधी कानपुरिए, पंच बीट आणि साड्डा हक असे सिनेमे केले आहेत.
7/9
अनंगशा बिस्वास - अनंगशा बिस्वासनं सिरिजमध्ये ग्लॅमरचा तडका लावण्याचं काम केलंय. तिनं जरीनाची भूमिका साकारली आहे. अनंगशानं आधी लव शव दे चिकन खुराना, खोया खोया चांद आणि होस्टेजेसमध्ये काम केलं आहे.
8/9
मेघना मलिक - मिर्झापूरच्या सेकंड सिझनमध्ये शरदच्या आईची भूमिता मेघनानं केलीय. चांगल्या पद्धतीनं तिनं आपली छाप सोडलीय. तिनं आधी ना आना इस देस लाड़ो ही टिव्ही सिरियल केली होती. अंग्रेजी मीडियम, कुछ ना कहो या सिनेमातही तिनं काम केलंय.
9/9
अलका अमिन - अलका अमिन हे बॉलिवूडमधलं चर्चित नाव आहे. मिर्झापूरच्या दुसऱ्या सिझनमध्ये त्या दिसतात. दद्दा त्यागीची पत्नी ‘गीता’ ची भूमिका त्यांनी साकारलीय. त्या बधाई हो, शादी में ज़रूर आना, केदारनाथ अशा सिनेमात दिसून आल्या आहेत.