मागच्या 54 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक संघर्षाचे प्रसंग आले. पवारांची राजकीय कारकीर्द संपली असं देखील म्हटलं गेलं. मात्र पवारांची जनतेशी जोडलेली नाळ घट्ट होती.
2/5
याची झलक 80 व्या वर्षात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दिसली. भाजपचा वारु चौफेर उधळलेला असतानाही 105 आमदारांचा पक्ष असलेल्या भाजपला विरोधात बसावण्याची किमया पवारसाहेबांनी करुन दाखवली आहे, असंही राष्ट्रवादीच्या अधिकृत पेजवर म्हटलं आहे.
3/5
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेली 54 वर्षे संसदीय राजकारणात असून 22 फेब्रुवारी 1967 रोजी त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली होती. त्यानंतर 54 वर्ष सलग ते कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य राहिलेले आहेत. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री, देशाचे सरंक्षणमंत्री, कृषीमंत्री अशी पदेही त्यांनी भूषवली आहेत याचीच आठवण राष्ट्रवादीकडून आज करुन देण्यात आली आहे.
4/5
देशातील सर्वात वरिष्ठ आणि ज्येष्ठ असलेले राजकारणी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातं. 80व्या वर्षात देखील राष्ट्रीय राजकारणात सक्रीय असलेले शरद पवार हे एकमेव राजकारणी आहेत.
5/5
शरद पवार यांनी पहिल्यांदा आमदारकीची शपथ घेतली तेव्हा त्यांचे वय अवघे 27 वर्ष एवढे होते. बारामतीसारख्या दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना दिली होती. विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात त्यांनी काम केलं. देशातील सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा मानही शरद पवार यांच्याकडेच आहे.