जेव्हा टनेल बोरींग मशीन भुयारी स्थानकासाठी खोदलेल्या खड्ड्यात दाखल होते. या घटनेला टनेल ब्रेक थ्रू म्हटले जाते.
2/7
टनेल बोरिंग मशीनचा 6.4 मीटरच्या अजस्त्र कटर हेडने जेव्हा दगड फोडून एन. ए. टी. एम. बोगद्या मध्ये प्रवेश केला तेव्हा महामेट्रोच्या उपस्थित इंजिनियर आणि अधिकारी वर्गाने त्याचे जल्लोषात स्वागत केले. आज झालेल्या टनेल ब्रेक थ्रू मशीनचे नाव मुठा असून त्याच्या सोबतीने मुठा टीबीएम मशीन लवकरच सिव्हिल कोर्ट मध्ये लवकरच ब्रेक थ्रू साधणार आहे.
3/7
भुयारी मार्ग कृषी महाविद्यालय येथील सुरुवात होत असून स्वारगेटपर्यंत जाणार आहे. या मार्गांमध्ये शिवाजीनगर बस स्थानक, सिविल कोर्ट, फडके हौद, मंडई व स्वारगेट ही पाच स्थानके असणार आहेत.
4/7
सिव्हिल कोर्ट मध्ये 160 मी एन.ए.टी.एम पद्धतीद्वारे एक बोगदा करण्याचे काम चालू आहे. या बोगद्याच्या उत्तरेकडील भागामध्ये टनेल बोरिंग मशीनच्या कटरने प्रवेश करून हा ब्रेक थ्रू साधला आहे. अशाप्रकारे एन.ए.टी.एम बोगद्यात टनेल ब्रेक थ्रू ही भारतातील निवडक घटनांपैकी एक आहे.
5/7
भुयारी मार्गाचे काम लवकर होण्यासाठी स्थानकांच्या ठिकाणी मोठा खड्डा करून खालुन बांधकाम करण्यात येते व भुयारी मार्गाचे काम टनेल बोरिंग मशीनच्या साहाय्याने करण्यात येते.
6/7
रेंजहील ते जिल्हा सत्र न्यायालयादरम्यानचा हा बोगदा असून त्यात दोन रेल्वे स्टेशन असतील. तर या दरम्यानच्या दुसऱ्या मार्गिकेचं काम पूर्ण व्हायला आणखी काही दिवस लागणार आहेत. एकूण पाच किलोमीटर मेट्रो जमिनी खालून धावणार आहे. त्यापैकी एका मार्गिकेवरील 1600 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. यापुढील बोगदा हा मुठा नदी खालून फडके हौद स्टेशन पर्यंतचा असेल.
7/7
पुणे महामेट्रोच्या रेंजहिल ते स्वारगेट या मार्गावरील बोगद्याचं खोदकाम पूर्ण झालंय. 1600 मीटरचे हे काम टनेल बोअरिंग मशीनने पूर्ण करण्यात आलं. 30 नोव्हेंबरला या कामाची सुरुवात झाली होती आणि आज दुपारी 3 वाजता एका मार्गिकेचं काम पूर्ण झालं.