प्रभास- आंध्र प्रदेशातील मुख्यमंत्री सहायता निधीत प्रभासनं मोठं योगदान दिलं. कोरोना क्रायसिस चॅरिटी (सीसीसी)ला त्यानं अतिरिक्त 50 लाखांची मदतही देऊ केली. कलाविश्वाशी संलग्न असणाऱ्या अनेक व्यक्तिंना त्यानं मदत देऊ केली. पंतप्रधान सहायता निधीमध्ये त्यानं तब्बल ३ कोटी रुपयांची मदत केली. २ कोटींच्या विकासनिधीसह तेलंगणामध्ये 1650 एकर भूखंडाची जबाबदारी त्यानं घेतली आहे. ज्याचं नामकरण त्याचे दिवंगत वडील उप्पलपति सूर्य नारायण राजू यांच्या नावे करण्यात येणार आहे.
2/6
सलमान खान- फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (एफडब्ल्यूआईसीई)मधील जवळपास 25 हजार दैनंदिन भत्त्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत केली. अनेक स्पॉटबॉयचीही त्यानं मदत केली. ‘बिइंग ह्यूमन’ या संस्थेमार्फत त्यानं गरजूंपर्यंत भोजनाची सामग्री पोहोचवली. शिवाय अनेकांना त्यानं अन्नदानासाठी प्रोत्साहितही केलं.
3/6
अक्षय कुमार – कोरोनासाठी आखून दिलेल्या काही प्रतिबंधात्मक उपायांच्या काटेकोर पालनासाठी खिलाडी कुमार बराच झटला. त्यानं पीएम- केअर फंड, मुंबई पोलीस फाऊंडेशन आणि सिंटा सहित इतरही अनेक संस्थांमध्ये आर्थिक मदत केली. या महामारीशी दोन हात करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही तो सहभागी झाला.
4/6
हृतिक रोशन – पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मोठी मदत देण्यासोबतच हृतिकनं पोलीस अधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसह इतरही कोविड 19 फ्रंट लायनर्सना शक्य त्या सर्व परिंनी मदत केली. रेल्वे प्रवासादरम्यानच्या जनजागृतीसाठी त्यानं सोशल मीडियाच्या आधारे मोलाचं योगदान दिलं. जवळपास 100हून अधिक डान्सर्सना त्यानं आर्थिक सहाय्य देऊ केलं.
5/6
सोनू सूद- प्रवास, निवारा आणि अन्नपुरवठा अशा प्रत्येक आवश्यक विभागात अभिनेता सोनू सूद यानं सढळ हस्ते मदत देऊ केली. एका हेल्पलाईनच्या माध्य़मातून तो सर्वांच्या संपर्कात राहिलाच. पण, त्याशिवायही सोशल मीडियावरुनही तो अनेकांनाच मदत करत होता. आरोग्य विभागात काम करणाऱ्यांसाठी सोनूनं मुंबईतील जुहूस्थित आपल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली. गरजूंना नियमित भोजनाची व्यवस्था करुन दिली.
6/6
(Coronavirus) कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातल्यामुळं 2020 हे वर्ष जवळपास सर्वांसाठीच आव्हानात्मक होतं. संपूर्ण विश्वावर धडकलेल्या या विषाणूच्या संकटानं परिस्थिती पुरती बदलली. भारतातही चित्र काही वेगळं नव्हतं. या कठिण परिस्थितीमध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं मदतीची गरज होती तेव्हा रुपेरी पडद्यावर झळकणारे अनेक अभिनेते खऱ्या जीवनातही ‘हिरो’ ठरले.