एक्स्प्लोर
Tushar Ghadigaonkar Marathi Actor: मराठी अभिनेता तुषार घाडीगावकरने आयुष्य संपवलं, मराठी इंडस्ट्रीत खळबळ, अख्खं भांडूप हळहळलं
Marathi Actor Tushar Ghadigaonkar: अभिनेता तुषार घाडीगावकारचं कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल, मृत्यूला कवटाळलं, मराठी इंडस्ट्री हादरली. भांडूप येथून तुषारची अंत्ययात्रा निघणार आहे.
Tushar Ghadigaonkar Marathi Actor
1/13

छोट्या पडद्यावरील विविध मालिका आणि नाटकांमधून भूमिका साकारणारा आणि प्रेक्षकांच्या ओळखीचा चेहरा झालेल्या अभिनेता तुषार घाडीगावकर (Tushar Ghadigaonkar) याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2/13

गेल्या अनेक दिवसांपासून ककौटुंबिक वादातून तुषारने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे.
3/13

तुषार घाडीगावकर हा मुंबईतील भांडूपमध्ये वास्तव्याला होता.
4/13

तुषार घाडीगावकरच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली आहे
5/13

तुषार घाडीगावकर याने आजपर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये लहान पण लक्षात राहणाऱ्या भूमिका केल्या होत्या. छोट्या पडद्यावरील 'लवंगी मिरची', 'मन कस्तुरी रे', 'सुखाच्या सरींनी हे मन बावरे' या मालिकांमध्ये काम केले होते.
6/13

तर 'भाऊबळी', 'उनाड', 'झोंबिवली', या मराठी चित्रपटांमध्येही तुषारने भूमिका साकारली होती.
7/13

'संगीत बिबट आख्यान' या नाटकातही तुषार घाडीगावकरने काम केले होते. अलीकडेच 'सन मराठी' वृत्तवाहिनीवर सुरु झालेल्या 'सखा माझा पांडुरंग' मालिकेतही तो झळकला होता.
8/13

तुषार घाडीगावकर हा मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचा होता. त्याने रुपारेल महाविद्यालयात असताना अभिनयाची सुरुवात केली होती.
9/13

रुपारेलच्या नाट्य विभागात तो परिचित चेहरा होता. मित्रांमध्ये 'घाड्या' म्हणून तो ओळखला जात होता.
10/13

इतक्या तरुण अभिनेत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने मराठी कलाविश्वात खळबळ उडाली आहे.
11/13

अभिनेता अंकुर वाढवे याने फेसबुकवर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'मित्रा का? कश्यासाठी? काम येतात जातात ! आपण मार्ग काढले पाहिजे पण आत्महत्या हा मार्ग नाही! मान्य आहे सध्याची परिस्थिती विचित्र आहे पण हा निर्णय नाही होऊ शकत. तुषार घाडीगावकर तू हरलास म्हणजे आम्ही सगळे हरलो', असे अंकुर वाढवे याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
12/13

"माणसं आतून खूप तुटलेली असू शकतात… अपेक्षा आणि वास्तव यांचं गणित कधीच जुळतं नाही… दोहोंमधली दरी वाढते आहे.. लोक बोलत नाहीत… ऐकायला कान नाहीत… उत्तरे काढायला कुणाला वेळ नाही.. आत्मीयता नाही. अशी माणसं नंतर नंतर एकटी पडत असावीत का ?? सगळ्यात असून" असे वैभव मांगले यांनी म्हटले आहे.
13/13

तुषार घाडीगावकरच्या जाण्याने मराठी कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Published at : 21 Jun 2025 11:56 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
भारत


















