एक्स्प्लोर
TMKOC Actor Jethalal Salary : जेठालालला मिळतं 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या एका भागाचं एवढं मानधन; किंमत ऐकून व्हाल थक्क
Layer_148
1/6

टेलिव्हिजनवरील सर्वात जुना आणि प्रसिद्ध कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'ने काही दिवसांपूर्वीच आपले 3100 एपिसोड्स पूर्ण केले. हा शो गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. शोप्रमाणेच यामधील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. भिडे, जेठालाल, मेहता, सोडी.... यांच्यासह अनेक पात्र प्रेक्षकांना खळखळून हसण्यास भाग पाडतात. पण तुम्हाला माहीत आहे का? या शोधमध्ये जेठालाल गडाची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी प्रति एपिसोड किती मानधन घेतात?
2/6

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत जेठालाल गडा यांची भूमिका साकारणारे दिलीप जोशी एका एपिसोडसाठी 1.5 लाख रुपये मानधन घेतात. ते या मालिकेतील हायएस्ट पेड अभिनेते आहेत.
3/6

दिलीप जोशी यांनी सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4/6

एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की, "अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यानंतरही जी ओळख मिळवता नाही आली, ती मला जेठालाल या पात्रानं मिळवून दिली."
5/6

दिलीप जोशी यांनी 'मैने प्यार किया' व्यतिरिक्त 'वन 2 का 4', 'ढूंढते रह जाओगे', 'वॉट्स योर राशि', 'खिलाड़ी 420', 'हमराज' आणि 'फिराक' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
6/6

दिलीप जोशी यांनी टीव्ही शो 'दो और दो पांच', 'हम सब बाराती', 'कोरा कागज' आणि 'दाल में काला' या टीव्ही शोजमध्ये काम केलं आहे.
Published at : 23 Jun 2021 11:45 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























