एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Marathi Actresses Tattoos: 'या' अभिनेत्रींच्या टॅटूचा अर्थ माहितीये?
अनेक मराठी अभिनेत्रींनी देखील टॅटू काढले आहेत. त्यांच्या टॅटूचा अर्थ आणि डिझाइनबाबत जाणून घेऊयात...
Marathi Actresses Tattoos
1/7

काही लोक आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावाचा टॅटू काढतात तर काही लोक विविध डिझाइन्सचा टॅटू काढतात. अनेक मराठी अभिनेत्रींनी देखील टॅटू काढले आहेत. त्यांच्या टॅटूचा अर्थ आणि डिझाइनबाबत जाणून घेऊयात...
2/7

'hdp' चा अर्थ Hruta, Dhruvi आणि Purva असा आहे. ध्रुवी आणि पूर्वा या हृताच्या बेस्ट फ्रेंड्स आहेत.
3/7

'ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातिल एक वीराणी,गगनात विऱ्सजित होता डोळ्यात कशाला पाणी' असं लिहिलेला टॅटू सखी गोखलेनं काढला आहे.
4/7

एक पोस्ट शेअर करुन सखीनं या टॅटूबाबत माहिती दिली होती. सखीच्या या टॅटूनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
5/7

सखीनं टॅटूचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'कुसुमाग्रजांच्या कवितेतील ओळी बाबांनी लिहिलेल्या शेवटच्या ओळी होत्या. त्याने आमच्या घराच्या दाराच्या मागच्या बाजूला लिहिले. जेव्हा आम्ही घराचे renovation केले तेव्हा माझ्या आईने तो दरवाजाचा तुकडा कापायला लावला. माझ्याकडे अजूनही तो तुकडा आहे.'
6/7

सायली संजीवनं एका पक्षाची डिझाइन असलेला टॅटू काढला आहे.
7/7

टॅटूचा फोटो सायलीनं सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'हे तुमच्यासाठी बाबा'
Published at : 25 Jul 2023 06:05 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























