एक्स्प्लोर
Suniel Shettys fitness routine : 61 वर्षाचा असूनही आहे Suniel Shetty फिट, पाहा त्याचे फिटनेस रूटीन!
Suniel Shetty shares his fitness routine: अलीकडेच अभिनेता सुनिल शेट्टीने एक व्हिडीओ करत सांगितले की, स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तो काय काय करत असतो. या फिटनेस रूटीनबद्दल सविस्तर माहिती घेऊया...
Suniel Shetty shares his fitness routine
1/9

सुनिल शेट्टीने बलवान सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.ते नव्वदीच दशक होतं. आज सुनिल शेट्टी 61 वर्षाचा झाला आहे. पण त्याचा फिटनेस तरूणाईला लाजवेल असा आहे.
2/9

त्याने एका व्हिडीओच्या माध्यमातून फिटनेस टीप्स शेअर केले आहे. यामध्ये त्याने एका आपलं रुटीन सांगितलं आहे.
3/9

या अभिनेत्याने व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले की, फिट राहण्यासाठी तो सकाळी 5 वाजता उठतो. त्याचं म्हणणे आहे की, सकाळी डिस्टर्ब करणारं कुणीही नसतं. यामुळे त्याला ही वेळ खूप आवडते.
4/9

पुढे तो असं सांगतो की, सकाळी लवकर उठल्यामुळे त्याला असं वाटते की, आपलं आयुष्यावर नियंत्रण आहे. यासोबत त्याला सकाळच्या वेळी खूप शांत वाटत असतं.
5/9

त्याने व्हिडीओमध्ये सांगितले की, सकाळी लवकर उठल्यामुळे कामाला सुरुवात करण्याधी त्याला स्वत:साठी वेळ मिळतो. त्याच्या म्हणण्यानुसार, सध्याचा काळात आपलं मन आजूबाजूच्या गोंगाटाकडे आकर्षिला जातो. अशा वेळी मन शांती आणि जीवनावरील नियंत्रण खूप आवश्यक आहे.
6/9

सकाळी 5 वाजता उठल्यानंतर तो आधी अंघोळ वगैरे करतो आणि मग जिममध्ये जाऊन व्यायाम करतो. त्याने सांगितले की, तो व्यायामशाळेत मोबाईल वापरत नाही. कारण ही वेळ त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते.
7/9

या अभिनेत्याला आपल्या फिटनेसोबत परिवाराचीही खूप काळजी आहे. त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणेही खूप आवश्यक वाटते.सुनिल शेट्टीला सकाळचा नाष्टा करताना आपली पत्नी, मुले आणि पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवतो. हे सर्व रूटीन तो आवडीने फॉलो करतो.
8/9

या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये बलवान सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. यानंतर त्याने टक्कर, गोपी-किशन, बॉर्डर, हेरी-फेरी असे सुपर-डुपर हिट सिनेमे दिले आहेत. त्याचा 'धडकन'सिनेमा त्याच्या नकारात्मक भूमिकमुळे प्रचंड हिट ठरला होता.यासाठी त्याला पुरस्कारही मिळाले.
9/9

सध्या सुनिल शेट्टी सिनेमामध्ये काम करताना दिसून येत नाही. मात्र तो एक मोठा व्यावसायिक आहे. त्याची कोटीची उलाढालही आहे. त्याचे देशभरातील काही महत्त्वाच्या शहरात हॉटेल्स आहेत. यामुळे तो एक अभिनेता, फिटनेस मॅन, फॅमिली मॅन आणि बिजनेस मॅन म्हणून आयुष्यात यशस्वी ठरला आहे.
Published at : 08 Jun 2023 09:45 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























