एक्स्प्लोर
निर्मात्यांनी लावले 4.5 कोटी, फिल्मनं केली 1250% छप्पडफाड कमाई; 'स्त्री 2', 'केजीएफ 2'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
Su From So Box Office Collection: 25 जुलै रोजी कन्नड चित्रपट 'सु फ्रॉम सो' प्रदर्शित झाला. आता 16 व्या दिवशीही हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करतोय. अशातच जाणून घेऊयात, या चित्रपटाचं बजेट आणि नफा...
South Movie Su From So Box Office Collection
1/8

25 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या कन्नड हॉरर-कॉमेडी चित्रपट 'सु फ्रॉम सो'नं एकूण कमाईत 'केजीएफ चॅप्टर 2'ला मागे टाकलं आहे.
2/8

25 जुलै रोजी प्रदर्शित झालेला कन्नड हॉरर-कॉमेडी चित्रपट 'सु फ्रॉम सो' प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटानं चांगली कामगिरी केली आहे आणि या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप प्रेम मिळतंय.
3/8

अलिकडेच हा कन्नड चित्रपट तेलुगु आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित झाला. कोईमोईच्या अहवालानुसार, या चित्रपटानं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण 56.23 कोटींची कमाई केली आहे.
4/8

आधी असा अंदाज लावला जात होता की 'सु फ्रॉम सो' हा चित्रपट 3 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे, पण आता दिग्दर्शक राज बी शेट्टी यांनी स्वतः एका मुलाखतीत चित्रपटाच्या बजेटची पुष्टी केली आणि सांगितलं की, हा चित्रपट एकूण 4.5 कोटींच्या बजेटमध्ये बनवला गेला आहे.
5/8

आता 16 व्या दिवशी 'सु फ्रॉम सो'च्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्यानं बंपर कमाई करतोय. कोइमोईच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या तिसऱ्या शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत 77 टक्क्यांची वाढ झाली आहे.
6/8

मीडिया रिपोर्टनुसार, फक्त 16 दिवसांत या चित्रपटानं 56.23 कोटी रुपये कमावले आहेत. 4.5 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या 'सु फ्रॉम सो'नं 51.73 कोटींचा नफा कमावला आहे. यासोबतच, या चित्रपटानं बजेटच्या अनेक पट कमाई करून नफ्याच्या बाबतीत सर्वात मोठी हॉरर-कॉमेडी 'स्त्री 2'लाही मागे टाकलं आहे.
7/8

एवढंच नाहीतर, कोईमोईच्या रिपोर्टनुसार, 'सु फ्रॉम सो'नं 'केजीएफ चॅप्टर 2'च्या प्रॉफिटच्या टक्केवारीलाही मागे टाकलं आहे. कोविडनंतर, या अॅक्शन थ्रिलर चित्रपटानं 759 टक्क्यांचा नफा कमावला होता. पण, आता 'सु फ्रॉम सो'नं 1250 टक्क्यांहून अधिक कमाई करून या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.
8/8

'सु फ्रॉम सो'मध्ये तुम्हीला हॉरर, कॉमेडी आणि सस्पेन्सचा जबरदस्त तडका मिळेल. या फिल्मला आयएमडीबीवर 8.7 रेटिंग मिळाली आहे. या फिल्मची कहाणी तुमच्या काळजाचा ठाव घेईल. फिल्ममार्फत कॉमिक टचसोबत सामाजिक मुद्द्यांला उत्तमरित्या सादर करण्यात आलं आहे.
Published at : 18 Aug 2025 06:54 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र























