मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकSalman Khan सह 'तेरे नाम'मध्ये झळकलेल्या Bhumika Chawla ची 'बिग बॉस 15' मध्ये एंट्री ?
Salman Khan सह 'तेरे नाम'मध्ये झळकलेल्या Bhumika Chawla ची 'बिग बॉस 15' मध्ये एंट्री ?
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 09 Jun 2021 08:55 AM (IST)
छाया सौजन्य - सोशल मीडिया
1/6
अभिनेता सलमान खान, याच्या 'तेरे नाम' या चित्रपटाला कमालीची लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातून झळकलेल्या अभिनेत्री भूमिका चावला हिचा चेहराही रातोरात प्रसिद्ध झाला. पण, या चित्रपटानंतर ती फार क्वचितच रुपेरी पडद्यावर झळकली.
2/6
आता म्हणे ही अभिनेत्री 'बिग बॉस 15' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार आहे.
3/6
पण, या चर्चा खोट्या असल्याचं आता खुद्द भूमिकानं ट्विट करत स्पष्ट केलं आहे. 'फेक न्यूज. मला 'बिग बॉस'ची ऑफर आलेली नाही. ऑफर असती तरीही मी ती नाकारली असती. मला 1,2 आणि 3 या पर्वांसाठीची ऑफर मिळाली होती. पण, मी ती नाकारली होती', असं तिनं ट्विट करत लिहिलं.
4/6
या कार्यक्रमात सहभागी न होण्याचीच इच्छा भूमिकानं व्यक्त केली.
5/6
मॉडेलिंगपासून सुरु करणाऱ्या भूमिकानं हिंदीच नव्हे तर तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
6/6
योगा प्रशिक्षक भरत ठाकूर यांच्याशी भूमिका चावला हिनं विवाहबंधनात अडकत खासगी जीवनाला प्राधान्य दिलं आणि ही अभिनेत्री या नव्या आयुष्यात चांगलीच रमली.