एक्स्प्लोर
गरोदरपणानंतर ट्रोल करणाऱ्यांना सई लोकूर म्हणाली..
सईला तिच्या शरीरावरुन अनेकांनी ट्रोल देखील केलं. तिच्या जाड शरीरावरुन अनेक कमेंट्स सईच्या व्हिडिओवर केल्या जातात. पण आता या सर्वांना सईने त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.

(photo:sai.lokur/ig)
1/8

बिग बॉस सिजन 1 (Bigg Boss Season 1) मुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) हिने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
2/8

तिने तिच्या सोशल मीडियावरुन ही गोड बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत सईचं अभिनंदन देखील केलं.
3/8

पण त्यावेळी सईला तिच्या शरीरावरुन अनेकांनी ट्रोल देखील केलं. तिच्या जाड शरीरावरुन अनेक कमेंट्स सईच्या व्हिडिओवर केल्या जातात. पण आता या सर्वांना सईने त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं.
4/8

सईने नुकतच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिच्या जाड शरीरामुळे ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. त्यावर सईने इन्स्टाग्राम पोस्ट करत या सगळ्या ट्रोलर्सना उत्तर दिल्याचं पाहायला मिळत आहे.
5/8

वेळी सईने तिच्या शरीरावरुन बोलणाऱ्यांविषयी राग व्यक्त केलाय. सईने तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्या दोघांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला.
6/8

सईने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन याविषयी भाष्य केलं. लोकांना जाड आणि बारीक याशिवाय दुसरं काही दिसतच नाही का, असा संतप्त सवाल यावेळी सईने विचारला. पुढे तिनं म्हटलं की, गरोदरपणानंतर स्त्रीला 6 महिन्यांची सुट्टी मिळते. पण मी माझ्या डिलीव्हरीनंतर अवघ्या तीन महिन्यांतच कामाला सुरुवात केली.
7/8

एखाद्या ब्रँडचं कोलॅबोरेशन करणं, व्हिडिओ शूट करणं या सगळं मी मॅनेज करतेय. पण नवी आई म्हणून या सगळ्याचं कौतुक करण्यापेक्षा माझ्या जाड शरीराकडे बघितलं जातं. ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. आपण कोणत्या समाजात राहतोय? एकमेकांना सहकार्य करण्यापेक्षा एकमेकांना मागे खेचण्यात आपल्याला जास्त रस वाटतो. सध्या सोशल मीडियावर सईच्या या पोस्टची बरीच चर्चा आहे.
8/8

ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. आपण कोणत्या समाजात राहतोय? एकमेकांना सहकार्य करण्यापेक्षा एकमेकांना मागे खेचण्यात आपल्याला जास्त रस वाटतो. सध्या सोशल मीडियावर सईच्या या पोस्टची बरीच चर्चा आहे.(all photo:sai.lokur/ig)
Published at : 01 Apr 2024 05:29 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
