एक्स्प्लोर
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीने सुरु केला बिझनेस, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली महत्त्वाची अपडेट
Laxmikant Berde daughter Swanandi Berde : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीने सुरु केला बिझनेस, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली महत्त्वाची अपडेट
Laxmikant Berde daughter Swanandi Berde
1/8

दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. स्वानंदीने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे.
2/8

मराठी चित्रपटसृष्टीत आजही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाची जादू आजही कायम आहे, तर कधीकाळी प्रिया बेर्डे यांची लोकप्रियताही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होती. दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी सध्या विशेष कारणामुळे चर्चेत आहे.
3/8

स्वानंदीने तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू करत व्यवसायाच्या जगात पाऊल टाकलं आहे. एका खास व्हिडिओद्वारे तिने चाहत्यांशी ही आनंदवार्ता शेअर केली.
4/8

या नव्या ज्वेलरी ब्रॅंडचं नाव ‘कांतप्रिया’ आहे. या नावामागे एक खास भावनिक गोष्ट दडलेली आहे.
5/8

स्वानंदीने सांगितलं की तिने वडिलांचं नाव ‘लक्ष्मीकांत’ आणि आईचं नाव ‘प्रिया’ एकत्र करून हे नाव ठेवलं आहे. या माध्यमातून ती आई-वडिलांच्या आठवणी जपते आहे, हे खूपच हृदयस्पर्शी आहे.
6/8

अभिनय क्षेत्रात काम करून झाल्यानंतर आता तिने उद्योजकतेच्या वाटेवर पाऊल ठेवलं आहे. “सर्व स्वप्नं करिअरशी निगडित नसतात, काही स्वप्नं मनातून जन्म घेतात. ‘कांतप्रिया’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे,” असं स्वानंदीचं म्हणणं आहे.
7/8

बेर्डे कुटुंबाचं चित्रपटसृष्टीशी नातं घट्ट आहे. भाऊ अभिनय बेर्डे अभिनय क्षेत्रात करिअर घडवताना दिसतोय, तर स्वानंदीने मात्र उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. तिच्या या धाडसी पावलाचं सोशल मीडियावर कौतुक होतंय.
8/8

इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असलेली स्वानंदी आधीपासूनच तिच्या फॅशन आणि स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत होती. पण आता उद्योजिका म्हणून तिची नवी ओळख प्रस्थापित करत आहे.
Published at : 22 Aug 2025 04:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























