एक्स्प्लोर
Smita Patil Birth Anniversary: जाणून घ्या अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटीलबद्दलच्या खास गोष्टी..
Smita Patil Birth Anniversary : वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती.

(फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
1/11

अभिनयाची सम्राज्ञी स्मिता पाटील यांचा आज वाढदिवस . आपल्या 10 वर्षांच्या करिअरमध्ये स्मिता पाटील यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला काही अप्रतिम कलाकृती दिल्या.(फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
2/11

हिंदी सिनेमांसाठीच्या योगदानामुळे आजही त्यांना एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. (फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
3/11

वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या उमद्या अभिनेत्रीने अल्पावधीतच रसिक मनावर छाप सोडली होती.(फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
4/11

अभिनेता राज बब्बरसोबतच्या प्रेमामुळे स्मिता पाटील चर्चेत आल्या. (फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
5/11

राज बब्बर विवाहित असूनही स्मिता पाटीलशी लग्न करण्यास तयार झाले. यासाठी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिला. (फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
6/11

मुलगा प्रतीकच्या जन्मानंतर 13 डिसेंबर 1986 ला वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला.(फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
7/11

1977 साली भूमिका आणि 1980 मध्ये चक्र या चित्रपटांसाठी स्मिता पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसंच 1978च्या जैत रे जैत आणि भूमिका, 1981 साली उंबरठा, 1982 साली चक्र, 1983 मध्ये बाजार, 1985 मध्ये आज की आवाज या सिनेमांसाठी फिल्मफेअरनेही स्मिता पाटील यांना गौरवलं गेलं आहे.(फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
8/11

आपल्या सशक्त अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली स्मिता पाटील गंभीर भूमिकांमध्ये जास्त रमली.पण गंभीर अभिनयासाठी ओळखली जाणारी स्मिता खऱ्याखुऱ्या आयुष्यात खोडकर होती.(फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
9/11

17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात स्मिता पाटील यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शिवाजीराव पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते, तर त्यांची आई समाजसेविका होती. (फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
10/11

स्मिता पाटील यांच्या निधनाला अनेक वर्ष उलटली, पण चाहते त्यांना विसरु शकलेले नाहीत. स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांनी अभिनय केलेले 14 चित्रपट प्रदर्शित झाले.(फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
11/11

आपल्या करिअरची सुरुवात स्मिताने अरुण खोपकरांच्या डिप्लोमा या सिनेमापासून केली. स्मिता पाटील यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.(फोटो सौजन्य : स्मिता पाटील / गुगल सर्च)
Published at : 17 Oct 2022 12:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
अकोला
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
