एक्स्प्लोर
Bollywood: पैसे वाचवण्यासाठी जान्हवी आणि सारा थांबल्या केदारनाथमधील स्वस्त हॉटेलवर; मध्यरात्री घडला 'हा' प्रकार
Bollywood Kissa: जान्हवी कपूर आणि सारा अली खान पैसे वाचवण्यासाठी केदारनाथ ट्रिपवर एका स्वस्त हॉटेलमध्ये थांबल्या, त्या दरम्यान भयानक प्रकार घडला.

Shraddha Kapoor and Sara Ali Khan
1/7

सारा अली खान भलेही नवाब घराण्यातील असली तरी प्रत्यक्षात ती खूपच कंजूस आहे. याच कारणामुळे एकदा तिला आणि जान्हवी कपूरला याची मोठी किंमत मोजावी लागली होती. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
2/7

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान आणि जान्हवी कपूर या चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. या दोघींच्या केदारनाथ यात्रेचा एक मजेदार किस्सा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
3/7

काही दिवसांपूर्वी सारा आणि जान्हवी केदारनाथ धामला दर्शनासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये दोघांनी याचा खुलासा केला होता.
4/7

शोमध्ये जान्हवी कपूरने सारा अली खानची पोलखोल केली. जान्हवी म्हणाली, "मी दोन थर्मल, एक पफर जॅकेट, तीन शाल, दोन ट्रॅक पँट आणि दोन स्वेटर घेऊन केदारनाथला गेली होती, तिथे पोहोचल्यानंतर मी ते सर्व कपडे घातले होते, तरीही मला थंडी वाजत होती" आणि अशा परिस्थितीत साराने बुक केलेलं हॉटेल अतिशय खराब होतं. त्यात एकही हिटर नव्हता आणि बाथरूमही तुटलेलं होतं.
5/7

यावर साराने उत्तर दिलं, त्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये फक्त 3 तास थांबणार होतो, इतक्या कमी वेळासाठी हॉटेलवर हजारो रुपये का खर्च करायचे? या विचाराने तिने स्वस्त हॉटेल बुक केलं. मात्र, रात्री जान्हवी थंडीने थरथरत होती हे पाहून खूप वाईट वाटल्याचं सारा म्हणाली.
6/7

सारा अली खान ही सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंहची मुलगी आहे. तर जान्हवी कपूर दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी आहे.
7/7

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सारा अली खान अलीकडेच विकी कौशलसोबत 'जरा हटके जरा बचके' मध्ये दिसली होती. दुसरीकडे, जान्हवी कपूर लवकरच वरुण धवनसोबत 'बवाल' चित्रपटात दिसणार आहे.
Published at : 17 Jul 2023 05:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
सातारा
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
