एक्स्प्लोर
Photo: अजय देवगनच्या 'भोला'च्या सैतानचा लूक जारी
अजय देवगणने त्याच्या भोला चित्रपटाच्या नवीन पोस्टरचे लूक जारी केले आहेत. त्यामध्ये दीपक डोबरियाल, विनीत कुमार आणि गजराज राव व्हिलनची भूमिका साकारणार आहेत.
Bholaa
1/8

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या नवीन चित्रपट भोलामध्ये व्यस्त आहे.
2/8

त्याने या सिनेमातील त्याचा आणि तब्बूचा लूक या आधीच शेअर केला आहे. आता अजयने बाकीच्या स्टारकास्टच्या लूकची झलक दाखवली आहे.
3/8

ते पाहून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. भोला चित्रपटात गजराज राव, दीपक डोबरियाल आणि विनीत कुमार सारखे स्टार्सही दिसणार आहेत.
4/8

अजय देवगणने भोला चित्रपटाचे तीन नवीन पोस्टर शेअर केले आहेत. पहिल्यामध्ये दीपक डोबरियाल दिसत आहेत. या चित्रपटात दीपिक डोबरियाल व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मेंढीच्या कातडीतील त्या भूताचं नाव सांगा, आम्ही त्याची मान कापू. सैतानाला कमी लेखू नका.
5/8

याशिवाय अजय देवगणने आणखी एक पोस्टर शेअर केलं आहे, त्यामध्ये विनीत कुमारच्या लूकची झलक दाखवण्यात आली आहे. पोस्टरमध्ये त्याचा चेहरा जळालेला दिसत आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'आम्ही रक्ताचे भक्त आहोत. या ठाण्याला स्मशानभूमी बनवा.
6/8

तिसऱ्या पोस्टरमध्ये अजय देवगणने गजराजचा लूक दाखवला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं आहे की, 'कौन बनेगा करोडपती न खेळता करोडपती बनलात, तर एवढ्या पैशांचे काय कराल?' विशेष म्हणजे, नवीन पोस्टरच्या कॅप्शनमध्ये अजय देवगणने तिन्ही पात्रांचे वर्णन भोलाचे सैतान असं केलं आहे.
7/8

अजय देवगनचा आगामी 'भोला' हा तमिळ चित्रपट कैथीचा हिंदी रिमेक असणार आहे. या चित्रपटात अजय देवगन मुख्य अभिनेता म्हणून दिसणार आहे.
8/8

यासोबतच त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ते त्याचा निर्माताही आहे. भोला चित्रपटात अभिषेक बच्चन आणि अमला पॉलसारखे स्टार्सही दिसणार असल्याची चर्चा आहे.
Published at : 03 Feb 2023 11:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























