एक्स्प्लोर
बॉक्स ऑफिसवर पठाणची जादू; 18 व्या दिवशी केली एवढी कमाई
पठाण (Pathaan) चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत. आता 18 व्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

Pathaan box office Day 18
1/10

शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा चित्रपट खास आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन केलं.
2/10

शाहरुखचा कमबॅक हा ब्लॉकबस्टर ठरला आहे. पठाण चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत.
3/10

आता 18 व्या दिवशी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
4/10

शनिवारी (11 फेब्रुवारी) पठाण या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर 924 कोटींचा टप्पा पार केला आहे.
5/10

शनिवारी (11 फेब्रुवारी) या चित्रपटानं भारतातील बॉक्स ऑफिसवर 11 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या भारतातील आतापर्यंतच्या कमाईनं 459.25 कोटींचा टप्पा गाठला आहे, अशी माहिती तरण आदर्श यांनी ट्वीटमधून दिली आहे.
6/10

आता भारतामध्ये 500 कोटी आणि जगभरामध्ये 1000 कोटींच्या क्लबमध्ये पठाण सामील होईल का? या प्रश्नाचं उत्तर शाहरुखच्या चाहत्यांना लवकरच मिळाले.
7/10

पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे.
8/10

शाहरुखनं पठाण चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
9/10

पठाण चित्रपटामधील गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामधील झुमे जो पठाण आणि बेशरम रंग या दोन गाण्यांवरील रिल्स नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
10/10

बेशरम रंग या गाण्यातील दीपिका आणि शाहरुखच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. पठाण या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदनं केलं आहे.
Published at : 12 Feb 2023 11:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
