Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य
बरंच प्रसिद्ध आहे...
फडणवीस म्हटल्याप्रमाणे पुन्हा आले...
मुख्यमंत्री झाले...
पण आता ते दिल्लीला जाणार का?
असा प्रश्न उपस्थित झालाय...
आणि त्यामागचं कारण आहे
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर घडलेल्या घडामोडी
मुख्यमंत्र्यांचं तातडीनं दिल्लीला जाणं आणि राजकीय वर्तुळात त्याची मोठी चर्चा होणं....
खरं तर फडणवीसांचा हा दौरा
नियोजित असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं
मात्र विरोधकांनी यावरून टोले मारण्याची आयती संधी सोडली नाही
माध्यमांमध्येही फडणवीस खरंच दिल्लीला जाणार का?
यासंबंधी चर्चा रंगल्या....
मात्र मुख्यमंत्र्यांनी आज नागपुरात बोलताना
एकाच वाक्यात या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला...
यामुळे, दिल्लीत मंत्रिपदाच्या मिळण्याच्या
आणि राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याच्या शक्यता
खुद्द देवेंद्र फडणवीसांनी फेटाळून लावल्यायत....
आणि मी इथेच आहे, असं म्हणत राज्यात आपली पकड मजबूत ठेवणार असल्याचं स्पष्ट केलंय....
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा
All Shows
































