एक्स्प्लोर

Bollywood Actress Richa Chaddha Trolling: '.. म्हणून जेष्ठांचा सन्मान करू नका...' बॉलिवूड अभिनेत्रीच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर गदारोळ, नेमकं काय म्हणाली?

ज्येष्ठ नागरिकांबाबत केलेल्या तिच्या विधानानंतर इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली असून, अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे

Bollywood Actress Richa Chadda Trolling: बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्या दमदार अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. मात्र, तिच्या एका ताज्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय. ज्येष्ठ नागरिकांबाबत केलेल्या तिच्या विधानानंतर इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली असून, अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे, तर काहींनी तिच्या मताचं समर्थन केलं आहे.

ज्येष्ठ नागरिकांबाबत रिचा चड्ढाचं वक्तव्य

रिचा चड्ढाने म्हटलं की, 'फक्त एखादी व्यक्ती ज्येष्ठ नागरिक आहे म्हणून तिचा सन्मान करू नका... काही जणांना 'भक्ती-डिमेन्शिया' झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्यांना आपण तरुणांशी भिडू शकतो, असा भ्रम होतो; पण रात्री पाच वेळा बाथरूमला न जाता त्यांची रात्रही जात नाही.केवळ वय झालं म्हणून त्यांचा आपोआप सन्मान करू नका. ते फक्त तुमच्यापेक्षा आधी जन्माला आले आहेत. त्यांनी त्यांच्या वागणुकीतून आणि कृतीतून तो सन्मान मिळवावा.रस्त्याच्या कोपऱ्यात, सुरक्षित अंतर ठेवून वर्तमानपत्रावर थोडं अन्न ठेवा. त्यांच्याशी वाद घालू नका किंवा संवाद साधू नका."

सोशल मीडियावर रंगली जोरदार चर्चा

रिचाने शिक्षणाशी संबंधित आंदोलनादरम्यान एका तरुण आंदोलनकर्त्याला पाठिंबा देत X वर ही पोस्ट शेअर केली होती.  एका युजरने लिहिलं, "जसं तुमच्या बॉलिवूड कारकिर्दीला कोणी गांभीर्याने घेत नाही, तसंच तुमच्या वक्तव्यालाही महत्त्व नाही. तुम्ही नेहमी देशविरोधी भूमिका घेत आल्या आहात." दुसऱ्या एका युजरनेही रिचावर निशाणा साधत तिच्या वक्तव्याला आक्षेपार्ह म्हटलं. दुसरीकडे, अनेकांनी रिचा चड्ढाच्या भूमिकेचं समर्थनही केलं. त्यांच्या मते, तिचा मुद्दा वयाचा नव्हता, तर जबाबदारी आणि वर्तनाचा होता. तिच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं म्हणत अनेकांनी तिला समर्थनही दिलंय.

रिचा चड्ढाचे आगामी प्रोजेक्ट्स

कामाच्या आघाडीवर, रिचा चड्ढा लवकरच 'आखिरी सोमवार' या चित्रपटातून लेखिका आणि अभिनेत्री म्हणून पदार्पण करणार आहे. याशिवाय ती अभिनेता अली फजलसोबत दिल्लीवर आधारित एका सिच्युएशनल कॉमेडी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. तसेच, एका ओटीटी क्राइम-थ्रिलर मालिकेत ती डिटेक्टिव्हच्या भूमिकेतही झळकणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nushrratt Bharuccha Accident: बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा परदेशात भीषण अपघात; गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरू
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा परदेशात भीषण अपघात; गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीची प्रकृती आता कशी?
Bollywood Actress Khushbu Sundar Struggle Life: सुपरस्टार गोविंदाची स्टार अभिनेत्री, वयाच्या दहाव्या वर्षी सुरू केली ॲक्टिंग, पुढे एवढी प्रसिद्ध झाली की, लोकांनी थेट मंदिरंच बांधली, ओळखलं का कोण?
सुपरस्टार गोविंदाची स्टार अभिनेत्री, वयाच्या दहाव्या वर्षी सुरू केली ॲक्टिंग, पुढे एवढी प्रसिद्ध झाली की, लोकांनी थेट मंदिरंच बांधली, ओळखलं का कोण?
विजय साळगावकर आता तरी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार? 'दृश्यम 3'चा फर्स्ट रिव्यू समोर, अजय देवगणच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सीक्वल पाहावा की नाही?
विजय साळगावकर आता तरी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार? 'दृश्यम 3'चा फर्स्ट रिव्यू समोर
'दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?
'दृश्यम 3'च्या सस्पेन्ससह ॲक्शन अन् कॉमेडीचा तडका, ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये 12 सिनेमांचा धमाका; कधी काय रिलीज होणार?
Advertisement

व्हिडीओ

Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report
Parth Pawar Mundhwa Land Case : 99 टक्के भागीदार अडचणीत पार्थ पवार? Special Report
Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on Gandhi Jayanti 2026: सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, पण इतकं सगळं असूनही... राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, महात्मा गांधींचं स्मरण
सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, पण इतकं सगळं असूनही... राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, महात्मा गांधींचं स्मरण
Diveagar beach Tragedy Raigad: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारं दृश्य, विद्यार्थ्यांचे सात मृतदेह, पोलिसांनी सीपीआर ट्रिटमेंट दिली पण....
Raigad Diveagar beach Tragedy: आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
आळंदीच्या विद्यार्थ्यांसाठी दिवेआगरची सहल ठरली काळी आठवण, आठ मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवताच पालकांना हुंदका अनावर, बस आळंदीत पोहोचली
Samruddhi Mahamarg Accident: दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?
दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...; 7 जणांचा दुर्दैवी अंत, समृद्धी महामार्गावर नेमकं काय घडलं?
Raigad Diveagar beach Tragedy: मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला
मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला
IND A vs AUS A : साई सुदर्शन निघाला फुसका बार, स्वत:ला सिद्ध करायची संधी होती, पण पुन्हा टाकली नांगी; ऑस्ट्रेलियाकडून मायदेशातच इंडियाची कोंडी
साई सुदर्शन निघाला फुसका बार, स्वत:ला सिद्ध करायची संधी होती, पण पुन्हा टाकली नांगी; ऑस्ट्रेलियाकडून मायदेशातच इंडियाची कोंडी
Hindu Religion: गोत्र म्हणजे नेमकं काय? आपलं गोत्र कसं ओळखावं? धार्मिक विधींमध्ये याला इतकं महत्त्व का? धार्मिक मान्यता सांगते...
गोत्र म्हणजे नेमकं काय? आपलं गोत्र कसं ओळखावं? धार्मिक विधींमध्ये याला इतकं महत्त्व का? धार्मिक मान्यता सांगते...
Ind vs Pak ODI World Cup 2027 Schedule : भारत वि पाकिस्तान किती सामने, मैदान कोणतं, वेळ काय, वर्ल्ड कपचा थरार, संपूर्ण Time Table
भारत वि पाकिस्तान किती सामने, मैदान कोणतं, वेळ काय, वर्ल्ड कपचा थरार, संपूर्ण Time Table
Embed widget