एक्स्प्लोर

Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...

रावणाची भूमिका साकारताना सेटवर तो एक खास गोष्ट करायचा ज्यामुळे त्याला त्या पात्रात लगेच शिरकाव करता यायचा, तो नेमकं काय करायचा? हे त्याने अलीकडेच उलगडलं आहे.

Ramayan Yash on Ravan : एका शतकाहून अधिक काळापासून भारतीय चित्रपटसृष्टीने रामायणाची कथा वेगवेगळ्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. मूक पटांच्या काळापासून ते बॉलीवूड पर्यंत अनेकांनी हे महाकाव्य मोठ्या पडद्यावर अगणित वेळा पुन्हा पुन्हा सांगितले आहे. सध्या नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाची  सगळीकडे एकच चर्चा आहे. 4000 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला होता. प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच हा ट्रेलर येणार असल्यामुळे आणखीनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  या चित्रपटातील स्टार कास्टची ही जोरदार चर्चा असून रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यश प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. रावणाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी यशने केवळ लूकवर नाही, तर रावणाच्या मानसिकतेवरही विशेष मेहनत घेतलाच त्याने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. रावणाची भूमिका साकारताना सेटवर तो एक खास गोष्ट करायचा ज्यामुळे त्याला त्या पात्रात लगेच शिरकाव करता यायचा, तो नेमकं काय करायचा? हे त्याने अलीकडेच उलगडलं आहे. रिव्ह्यू नेशनला दिलेल्या मुलाखतीत या भूमिकेच्या तयारीविषयी त्याने खुलासा केलाय.

रावणाच्या भूमिकेत शिरण्यासाठी करायचा 'ही' खास गोष्ट

अभिनेता यश टॉक्सिक आणि रामायण या दोन चित्रपटातून या वर्षी प्रेक्षकांसमोर येणार आहे. या भूमिकेच्या तयारी विषयी बोलताना तो म्हणाला 'जेव्हा मी रावणाचा भव्य आणि वजनदार मुकुट चढवून सेटवर यायचो, त्यावेळी आपोआप त्या पात्रात शिरायचो. पण त्या वातावरणात कायम राहण्यासाठी मी सेटवर मोठे स्पीकर्स आणायचो.आणि मोठ्या आवाजात भगवान शिवाची भक्तीगीते लावायचो.रावण हा शिवाचा मोठा भक्त होता. त्यामुळे त्या संगीतामुळे मी त्या भूमिकेत पूर्णपणे तल्लीन व्हायचो ' असं त्यानं सांगितलं. या गाण्यांचा आणि संगीताचा आवाज एवढा मोठा असायचा की सेटवर कोणालाही सहजपणे बोलता येत नसे, असंही त्यानं सांगितलं. यश मी सांगितलं दिग्दर्शक नितेश तिवारी अनेकदा त्याच्या या सवयीची गंमत करायचे. अभिनेता रणबिर कपूरनेही याबाबत बोलताना म्हटलं 'सेटवर गाणी लावताच संपूर्ण वातावरण आणि एनर्जी बदलून जायची'..

कधी येणार रामायणचा ट्रेलर ?

खरंतर रामायणचा अधिकृत ट्रेलर 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार होता.मात्र देशातील विद्यार्थी आंदोलन आणि सोनी पिक्चर्स सोबतच्या वितरण प्रक्रियेमुळे ट्रेलरचे प्रदर्शन पुढे ढकळण्यात आल्याचा सांगण्यात आलं.आता हा ट्रेलर ३० जुलै रोजी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.रामायण चा पहिला भाग यंदाच्या दिवाळीत येणार असून दुसरा भाग 2017 मधील दिवाळीत जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Yash Ravan: 4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
4000 कोटींच्या रामायणमध्ये रावण साकारताना अभिनेता सेटवर करायचा 'ही' एक गोष्ट; वजनदार मुकूट चढवून...
Manasi Kulkarni share screen with daughter: रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
रुपेरी पडद्यावर मायलेकीची जुगलबंदी; 'द्विधा'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी कुलकर्णीसोबत तिची लेकही झळकणार
Lock Upp 2 Sufi Motiwala: 'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
'रुममेटने जबरदस्तीने स्पर्श केला अन् Kiss...' 12 तास प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरने स्वत:ला बाथरुममध्ये कोंडून ठेवलं, रडत म्हणाला...
Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या दिवसांची भविष्यवाणी व्हायरल! 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर; 'हा' काळ जॅकपॉटचा! तुमची रास?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party: तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
तर आम्हाला पुन्हा एकदा सक्तीनं आंदोलनाला बसावं लागेल! काॅकरोच पार्टीचा अवघ्या काही तासांमध्ये मोदी सरकारला गर्भित इशारा, जेपी ड्डा आणि जितेंद्र सिंह यांनाही आठवण करून दिली!
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
पुष्पास्टाईल चोरी... भाजीपाल्याच्या गाडीतून खैराची तस्करी, वन विभागाकडून लाकडासह टेम्पो जप्त
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
Sushma Andhare On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
Embed widget