एक्स्प्लोर
Mirzapur 3 :'कालिन भैय्या' नाही तर 'मिर्झापूर'मधील ही भूमिका साकारायची होती, शूटिंगवेळी पंकज त्रिपाठींच्या मनात काय होतं?
Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठी सध्या त्यांच्या 'मिर्झापूर 3' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. या मालिकेतील आपल्या व्यक्तिरेखेबाबत पंकज त्रिपाठींनी मोठा खुलासा केला आहे.
Pankaj Tripathi
1/9

पंकज त्रिपाठी केवळ अभिनयासाठीच नाही तर त्यांच्या साध्या शैलीसाठीही ओळखले जातात. या अभिनेत्याने प्रत्येक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आउट ऑफ द बॉक्स पात्रे साकारली आहेत आणि आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे.
2/9

'मिर्झापूर'मधील त्यांचे 'कालिन भैया' हे पात्र लोकांच्या पसंतीस उतरलं होतं. पण पंकज त्रिपाठींना कालिन भैय्या नव्हे तर या सीरिजमधीलएक स्त्री पात्र साकारायचं होतं.
3/9

2020 मध्ये जेव्हा मिर्झापूरचा दुसरा पार्ट आला होता, त्यानंतर एका मुलाखतीत पंकज त्रिपाठीने खुलासा केला होता की, या मालिकेत त्याला कलिन भैय्या नव्हे तर दुसरी भूमिका साकारायची होती.
4/9

पंकज त्रिपाठी यांनी सांगितले होते की, त्यांना मिर्झापूरमध्ये बीना त्रिपाठीची भूमिका खूपच मनोरंजक वाटते आणि जर त्यांच्याकडे पर्याय असता तर त्यांना बिना त्रिपाठीची भूमिका करायची होती.
5/9

बीना त्रिपाठीच्या व्यक्तिरेखेत बरेच रहस्य असल्याचे पंकज त्रिपाठी यांचे मत आहे. रसिका दुग्गलने ही व्यक्तिरेखा पडद्यावर उत्तमरित्या साकारली आहे.
6/9

रसिका दुग्गनने ‘बीना त्रिपाठी’ या मालिकेत भूमिका साकारली आहे. जी पंकज त्रिपाठी यांची पत्नी बनली आहे. या व्यक्तिरेखेतून रसिकाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. आता या मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्येही तिची व्यक्तिरेखा अतिशय दमदार असणार आहे.
7/9

'मिर्झापूर 3' लवकरच प्रदर्शित होणार आहे. ही सीरिज 5 जुलैपासून Amazon Prime वर स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे.
8/9

'मिर्झापूर'चा तिसरा सीझन 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. पहिला सीझन 12 कोटी रुपये आणि दुसरा सीझन 60 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता.
9/9

पंकज त्रिपाठीबद्दल सांगायचे तर, ओटीटी व्यतिरिक्त, त्याने 'OMG 2', 'मिमी', 'स्त्री', 'फुक्रे', 'कागज' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
Published at : 02 Jul 2024 11:23 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















