एक्स्प्लोर
Photo : तब्बल 14 वेळा ‘फिल्मफेअर' नामांकन मिळवणारी बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’, जाणून घ्या माधुरी दीक्षितबद्दल...
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/21ab409c0548639f9e4a6676c634744b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Madhuri Dixit
1/6
![बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/23344800451c5aa48fa7ff117089812b212a0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या अभिनयाने आजही प्रेक्षकांना स्तब्ध करत आहे. माधुरी 90च्या दशकातील बॉलिवूडची सर्वात मोठी सुपरस्टार होती. 1984 मध्ये राजश्री प्रॉडक्शन निर्मित 'अबोध' या चित्रपटातून माधुरीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पहिल्या चित्रपटाच्या वेळी माधुरी केवळ 17 वर्षांची होती.
2/6
![माधुरीचा हा चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही. यानंतरही माधुरीचे अनेक चित्रपट तसे डब्यातच गेले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/5f9ca03cea3fc5da2173a05e2d0a75b84de85.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीचा हा चित्रपट फारशी जादू दाखवू शकला नाही. यानंतरही माधुरीचे अनेक चित्रपट तसे डब्यातच गेले होते. करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीला 1988 मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
3/6
![या चित्रपटाने माधुरीच्या बुडत्या करिअरची दिशाच बदलून टाकली. माधुरी दीक्षितचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, ज्यामुळे ती रातोरात स्टार बनली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/bce28669a36e97202639e9c43de70eefbec0c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या चित्रपटाने माधुरीच्या बुडत्या करिअरची दिशाच बदलून टाकली. माधुरी दीक्षितचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, ज्यामुळे ती रातोरात स्टार बनली.
4/6
!['तेजाब'चित्रपटामधील 'एक दो तीन' या सुपरहिट गाण्याने माधुरीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. या चित्रपटापासून तिच्या ‘धकधक गर्ल’ होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/83ded158d7bcc6e7203a0943d20488d607cf1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'तेजाब'चित्रपटामधील 'एक दो तीन' या सुपरहिट गाण्याने माधुरीने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. या चित्रपटापासून तिच्या ‘धकधक गर्ल’ होण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली.
5/6
![माधुरीच्या ‘बेटा’ चित्रपटातील ‘धकधक करने लगा’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. आपल्या नृत्याने लोकांचे मन जिंकणाऱ्या माधुरीला लोक ‘धकधक गर्ल’ या नावाने हाक मारू लागले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/e0930754c0f443e86bd7d5d6ec0a0fee73e89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीच्या ‘बेटा’ चित्रपटातील ‘धकधक करने लगा’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. आपल्या नृत्याने लोकांचे मन जिंकणाऱ्या माधुरीला लोक ‘धकधक गर्ल’ या नावाने हाक मारू लागले.
6/6
![या प्रवासामध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, एक-दोन नव्हे, तब्बल 6 वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कारां’वर माधुरीने आपले नाव कोरले आहे. तर, 14 वेळा तिने या पुरस्कारांत नामांकन मिळवले आहे. (Photo : @madhuridixitnene/IG)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/a57f307f5d0cf25af98b6893197e969033e2e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रवासामध्ये तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, एक-दोन नव्हे, तब्बल 6 वेळा ‘फिल्मफेअर पुरस्कारां’वर माधुरीने आपले नाव कोरले आहे. तर, 14 वेळा तिने या पुरस्कारांत नामांकन मिळवले आहे. (Photo : @madhuridixitnene/IG)
Published at : 15 May 2022 07:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)