एक्स्प्लोर
PHOTO : मॉडेलिंग आणि बॉलिवूडच नव्हे तर, साऊथ इंडस्ट्रीतही नाव गाजवणारी जिनिलिया डिसूजा!
बॉलिवूडची क्युट अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D’Souza) आज (5 ऑगस्ट) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे.
Genelia DSouza
1/6

बॉलिवूडची क्युट अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D’Souza) आज (5 ऑगस्ट) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलिया डिसूजा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात क्युट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला तिच्या गोड हास्यामुळे मॉडेलिंग विश्वात वाहवा मिळाली होती.
2/6

फार कमी वेळात जिनिलिया डिसूजाने भारतातील अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला. अभिनेत्रीचे सर्वच चित्रपट जवळपास हिट ठरले. जिनिलियाने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
3/6

जिनिलियाने तिच्या महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान मॉडेलिंगमध्ये करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी ती अवघ्या 15 वर्षांची होती. मॉडेलिंगदरम्यानच तिला बॉलिवूड चित्रपटाची ऑफरही आली.
4/6

जिनिलियाने 2003मध्ये वयाच्या 21व्या वर्षी रितेश देशमुखसोबत (Riteish Deshmukh) 'तुझे मेरी कसम' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तिने मराठी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे.
5/6

जिनिलिया डिसूजाला वयाच्या 15व्या वर्षी मॉडेलिंगची पहिली ऑफर मिळाली, ज्यामध्ये तिला पार्कर पेनच्या जाहिरातीत काम करायचे होते. या जाहिरातीत तिला अमिताभ बच्चन यांच्यासोबत पारकर पेनची जाहिरात करायची होती.
6/6

दरम्यान ती मॉडेलिंग क्षेत्रात सक्रिय झाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पहिला चित्रपट स्वीकारला. 2003मध्ये तिला ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पहिलाच हिंदी चित्रपट हिट झाल्यानंतर जिनिलियाला तमिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले. (Photo : @geneliad/IG)
Published at : 05 Aug 2022 09:40 AM (IST)
आणखी पाहा























