कोकणी ही दीपिकाची मातृभाषा आहे. अभिनयापूर्वी तिनं बॅडमिंटन स्पर्धांमध्येही सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात सक्रिय असूनही तिनं मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्याला प्राधान्य दिलं.
2/6
दीपिकानं तिचा प्रवास हिमेश रेशमियाच्या एका पॉप साँग अल्बममधून सुरु केला होता. 'आप का सुरूर', 'नाम है तेरा' या गाण्यांमधून ती झळकली होती. 2006मध्ये तिनं प्रथमच कन्नड चित्रपटात काम केलं होतं. 2007 मध्ये तिनं हिंदी कलाविश्वात 'ओम शांति ओम' या चित्रपटातून पदार्पण करत शाहरुख खान याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती.
3/6
दीपिका एक वर्षाची असतानाच तिचं कुटुंब कोपनहेगनहून बंदळुरूमध्ये आलं. जिथं तिनं सुरुवातीला सोफिया हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. पुढं तिनं समाजशास्त्रातील पदवी शिक्षण घेतलं.
4/6
दीपिकाचा जन्म डेन्मार्कमधील कोपनहेगम येथे झाला होता. बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची ती मुलगी. दीपिकाची आई उज्जला एक ट्रॅव्हल एजंट आहे, असं म्हटलं जातं. तर, तिची बहिण अनिषा गोल्फर आहे.
5/6
'आँखो मे तेरी...' असं गाणं वाजताच कारमधून उचरणारी, समोर जमलेल्या गर्दीला हात उंचवत अभिवादन करणारी शांतिप्रिया तुम्हाला आठवतेय का? अर्थात आठवतच असेल. ही शांतिप्रिया दुसरी तिसरी कोणी नसून, ती आहे अभिनेत्री दीपिका पदुकोण. अतिशय कमी कालावधीत हिंदी कलाविश्वात आणि ओघाओघानं आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नाव मोठं करणाही ही देखणी अभिनेत्री. अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी दीपिका आज ( 5 December ) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाच्या निमित्तानं चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.
6/6
दीपिकानं साकारलेल्या बहुतांश भूमिका तितक्याच वेगळ्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या. मग ती पिकू असो, शांतिप्रिया असो किंवा मग ऐतिहासिक रुपातील राणी पद्मावती आणि मस्तानी असो. प्रत्येक भूमिका ती खऱ्या अर्थानं जगली. आज करिअरमध्ये यशाच्या या टप्प्यावर असूनही दीपिका तिचा मुळातील स्वभाव काही बदलू शकली नाही हेच तिचं खरं यश आहे. चला तर मग जाणून घेऊया याच अभिनेत्रीबाबतच्या काही रंजक गोष्टी.