एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
शाहरुख, सलमान की रजनीकांत? वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण?
Highest Paid Actors 2024 : सध्या बॉलिवूड, सिनेइंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण? एका वृत्तानुसार, यंदाच्या वर्षात सर्वाधिक कमाई करणारे अभिनेते कोण यावर एक नजर...
बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानसाठी गेले वर्ष खूप लकी ठरले. त्याचे तीन बॅक टू बॅक चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. 2023 मध्ये तीन हिट चित्रपट देणारा बॉलिवूड सुपरस्टार शाहरुखने सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. यासह त्याने आमिर खान, सलमान खान आणि अक्षय कुमार सारख्या बॉलीवूड स्टार्स तसेच रजनीकांत, प्रभास, थलपथी विजय आणि अल्लू अर्जुन सारख्या सेलिब्रिटींना मात दिली आहे. अमिताभ बच्चन 2024 च्या टॉप 10 सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत स्थान मिळवू शकले नाहीत.
1/10

फोर्ब्सने IMDB च्या मदतीने संकलित केलेल्या यादीमध्ये, शाहरुख खान हा 2024 मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. प्रत्येक चित्रपटासाठी ते 150 ते 250 कोटी रुपये फी घेत असल्याची माहिती आहे. फोर्ब्स इंडियानुसार, शाहरुख खानची एकूण संपत्ती 6300 कोटी रुपये आहे.
2/10

शाहरुखनंतर तामिळ सुपरस्टार रजनीकांत हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रजनीकांत 150 कोटी ते 210 कोटी रुपये मानधन घेतात. त्यांची अंदाजे एकूण संपत्ती 430 कोटी रुपये आहे.
3/10

थलपथी विजय या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ते प्रत्येक प्रोजेक्टसाठी 130 कोटी ते 200 कोटी रुपयांचे मानधन आकारतो.
4/10

विजयनंतर प्रभासचा क्रमांक लागतो. प्रभास हा एका प्रोजेक्टसाठी 100 कोटी ते 200 कोटी रुपये मानधन घेतो.
5/10

image 3
6/10

आमिर खाननेही टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे. तो त्याच्या प्रत्येक चित्रपटासाठी 100 कोटी ते 175 कोटी रुपये मानधन घेतो.
7/10

या यादीत सहाव्या क्रमांकावर सलमान खान आहे. भाईजान हा प्रत्येक चित्रपटासाठी 100 कोटी ते 150 कोटी रुपये फी घेतो.
8/10

तर कमल हसन या यादीत सातव्या क्रमांकावर आहे. ते 100 कोटी ते 150 कोटी रुपये घेतात.
9/10

बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार या यादीत 9व्या स्थानावर आहे. अक्षय कुमार प्रत्येक चित्रपटासाठी 60 कोटी ते 145 कोटी रुपये मानधन घेत असल्याची चर्चा आहे.
10/10

दाक्षिणात्य सुपरस्टार असलेला अभिनेता अजित हा 105 कोटी रुपये मानधन घेतो.
Published at : 18 Jun 2024 02:49 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
क्राईम
भारत



















