एक्स्प्लोर
Amala Paul: केरळमधील मंदिरात मिळाला नाही प्रवेश; दाक्षिणात्य अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना
अमाला पॉलने (Amala Paul) आरोप केला आहे की, धार्मिक भेदभावामुळे तिला केरळमधील मंदिरात प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकाऱ्यांनी रोखले.

(Amala Paul/instagram)
1/10

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉलला केरळमधील एका हिंदू मंदिरात प्रवेश देण्यात आला नाही. (Amala Paul/instagram)
2/10

अमाला पॉलने आरोप केला आहे की, "धार्मिक भेदभावामुळे" तिला केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील तिरुवैरानिकुलम महादेव मंदिरात प्रवेश करण्यापासून मंदिरामधील अधिकाऱ्यांनी रोखले. (Amala Paul/instagram)
3/10

अमाला पॉल ही सोमवारी (16 जानेवारी) मंदिरात दर्शनासाठी गेली होती. (Amala Paul/instagram)
4/10

असं म्हटलं जात आहे की, मंदिराच्या अधिकाऱ्यांनी प्रथेबाबत सांगितले की, या मंदिराच्या आवारात फक्त हिंदूंनाच परवानगी आहे. (Amala Paul/instagram)
5/10

अमाला पॉलने असा आरोप केला आहे, की मंदिर प्रशासन अधिकारऱ्यांनी तिला मंदिरात प्रवेश घेऊ दिला नाही, त्यामुळे तिला मंदिरासमोरील रस्त्यावरुनच दर्शन घ्यावे लागले. (Amala Paul/instagram)
6/10

मंदिरामध्ये प्रवेश न मिळाल्याने अमालाने तिच्या या अनुभवाबद्दल मंदिराच्या विजिटर्स रजिस्टरमध्ये लिहिलं आहे. (Amala Paul/instagram)
7/10

'मी देवाजवळ जाऊ शकले नाही पण दूर जरी असले तरी ते अजूबाजूला असल्याचं जाणवलं. मला आशा आहे की, या धार्मिक भेदभावात लवकरच बदल होईल. वेळ येईल आणि आपल्या सर्वांना समान वागणूक दिली जाईल.' असं तिनं मंदिराच्या विजिटर्स रजिस्टरमध्ये लिहिलं . (Amala Paul/instagram)
8/10

अमाला पॉलला मंदिरात प्रवेश न मिळाल्याने आता तिरुवैरानिकुलम महादेव मंदिर ट्रस्टच्या प्रशासनावर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. (Amala Paul/instagram)
9/10

अमाला पॉलने मल्याळम, तेलूगू आणि तमिळ भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. (Amala Paul/instagram)
10/10

मैना, इथु नमुदे कथा, मुप्पोझधुम अन कर्पनैगल आणि रन बेबी रन यांसारख्या चित्रपटांमध्ये अमालाने प्रमुख भूमिका साकारली आहे. (Amala Paul/instagram)
Published at : 18 Jan 2023 01:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
मुंबई
सोलापूर
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
