एक्स्प्लोर
Shocking: अक्षय कुमारचा 'बेलबॉटम' पायरसी साइट्सवर एचडी स्वरूपात ऑनलाइन लीक

संपादित फोटो
1/9

अक्षय कुमारच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बेलबॉटम चित्रपटाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अक्षयचा हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला असून तो विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी देखील उपलब्ध आहे. (photo courtesy : @akshaykumar Instagram)
2/9

तुम्हाला आश्चर्य वाटेल की पायरेटेड साइटवर स्पाय-थ्रिलर एचडी स्वरूपात उपलब्ध आहे.(photo courtesy : @akshaykumar Instagram)
3/9

कोरोना महामारी दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्यांनी तो ओटीटीवर रिलीज करण्याऐवजी बॉक्स ऑफिसवर रिलीज केला. (photo courtesy : @akshaykumar Instagram)
4/9

पण आता या लीकच्या बातमीमुळे निर्मात्यांची चिंता आणखी वाढली आहे. नुकसान टाळण्यासाठी निर्माते या वेबसाइटवर कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे.(photo courtesy : @akshaykumar Instagram)
5/9

चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर अक्षय कुमार एका गुप्तचर एजंटची भूमिका साकारत आहे, ज्याचं कोडनेम 'बेल बॉटम' आहे.(photo courtesy : @akshaykumar Instagram)
6/9

एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा अक्षयला विचारण्यात आले की तो बेल बॉटमच्या सिक्वेलची योजना आखत आहे का? त्यावर तो म्हणाला की, जर तुम्ही चित्रपटाचा शेवट बघितला तर निश्चितपणे सिक्वेलला वाव आहे.(photo courtesy : @akshaykumar Instagram)
7/9

याआधीच्या एका मुलाखतीत अक्षयला विचारण्यात आले की त्याने चित्रपटाच्या रिलीजसाठी स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्याऐवजी रक्षाबंधनचा आठवडा का निवडला? त्यावर खिलाडी कुमारने सांगतिलं की हा माझा निर्णय नाही. (photo courtesy : @akshaykumar Instagram)
8/9

चित्रपटाचे निर्माते श्री वाशु भगनानी हे सर्व पाहतात. त्यामुळे मला याबद्दल काहीच कल्पना नाही. मला वाटतं, वाशुजींच्या मते, 19 ऑगस्ट जास्त चांगला आहे. ते अनुभवी लोक आहेत, त्यांना याची जास्त माहिती आहे.(photo courtesy : @akshaykumar Instagram)
9/9

(photo courtesy : @akshaykumar Instagram)
Published at : 19 Aug 2021 04:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
