एक्स्प्लोर
Karwa Chauth 2021: येत्या करवा चौथ साठी रेडी होताय? 'या' अभिनेत्रींकडून घ्या टिप्स!
(फोटो : सोशल मीडिया)
1/8

भारतात करवा चौथचा सण एकदम उत्साहात साजरा केला जातो. नवऱ्याच्या मोठ्या आयुष्यासाठी साजरा केला जाणार हा सण लग्न झालेल्या स्त्रियांसाठी खूप खास असतो... या दिवशी स्त्रिया 16 शृंगार करतात ज्याची तयारी खूप आधीपासूनच सुरू होते, जर तुम्हीही या तयारीत व्यस्त असाल तर या टिप्स तुम्हाला नक्की मदत करतील
2/8

बॉलीवुड अभिनेत्री प्रियंका चोप्राने भले ही अमेरिकन सिंगर निक जोनस सोबत लग्न केलं असेल तरी ती भारतीय संस्कृती विसरलेली नाही. प्रियांका दर वर्षी करवा चौथ साजरी करते. मागील वर्षी प्रियांकाने ही सुंदर लाल रंगाची साडी परिधान केली होती.
3/8

शिल्पा शेट्टीचा प्रत्येक लूक शानदार असतो. मागच्या वर्षी करवा चौथला रेड कलर गोल्डन प्रिंटेड सादि नेसलेली, त्यासोबत तिने सुंदर असा नेकलेस घातलेला आणि केस मोकळे सोडलेले
4/8

अभिनेत्री अनुष्का शर्माने मागच्या वर्षी करवा चौथला मरून कलरची प्रिंटेड साडी नेसलेली, त्या लूक ला तिने झुमका घालून पूर्ण केलेलं. या फोटो मध्ये टिकली आणि सिंदूर लावलेलं दिसून येतंय.
5/8

बॉलीवुड अभिनेत्री बिपाशा बासुने करवा चौथ ला मरून कलरचा शरारा घातलेला, कपाळावर मोठी टिकली, कानात झुमका आणि हातात बांगड्या तिला खूपच सुंदर दिसत होत्या
6/8

बॉलीवुड अभिनेत्री काजोल सुद्धा दर वर्षी करवा चौथचा उपवास करते, मागच्या वर्षी काजोल ने प्लेन रेड रंगाची साडी नेसलेली. तिने केलेल्या या बंगाली लूक मध्ये ती फारच सुंदर दिसतीये
7/8

अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने सुद्धा करवा चौथ साठी रेड कलरच्या साडीला पसंती दिली. यात तिने केसात गजराही माळलाय.
8/8

जर तुम्ही साडी नसायचा प्लॅन करत असाल तर अभिनेत्री रवीना टंडनच्या या करवा चौथ लुकला ट्राय करू शकता. (फोटो : सोशल मीडिया)
Published at : 06 Oct 2021 05:16 PM (IST)
आणखी पाहा























