एक्स्प्लोर
PHOTO : हैदराबादच्या आलिशान घरात राहते साऊथ सुपरस्टार नागार्जुनची सून Samantha Akkineni; पाहा Inside फोटो
Samantha_Akkineni_photo_00
1/7

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी लवकरच 'द फॅमिली मॅन 2'मधून आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'द फॅमिली मॅन 2'चा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. ज्यामध्ये समंथाच्या लूकची जोरदार चर्चा केली जात होती. पण तुम्हाला माहितीये, पडद्यावर चाहत्यांना खिळवून ठेवणारी अभिनेत्री रिअल लाईफमध्ये कसं आयुष्य जगते. आज आम्ही तुम्हाला समंथाच्या घराचे इनसाईड फोटो दाखवणार आहोत. (Photo Credit : @samantharuthprabhuoffl/Instagram)
2/7

समंथा अक्किनेनी म्हणजे, साऊथ इंडस्ट्रीमधील एक मोठं नाव. लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारी समंथा साऊथ स्टार नागार्जुन यांची सून आहे. नागार्जुन यांचा मुलगा साऊथ स्टार नागा चैतन्यसोबत समंथाने आपली लग्नगाठ बांधली आहे. समंथा हैदराबादमध्ये राहते. (Photo Credit : @samantharuthprabhuoffl/Instagram)
3/7

समंथा सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तसेच ती नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. फोटोंमध्ये तुम्ही समंथासा तिच्या घरातील स्विमिंग पूलजवळ मस्ती करताना तसेच योगा करताना पाहू शकता. (Photo Credit : @samantharuthprabhuoffl/Instagram)
4/7

समंथाने आपल्या घरात एक वर्टिकल किचन गार्डनही तयार केलं आहे. ज्यामध्ये ती घरच्या घरी अनेक भाज्यांची लागवड करते. (Photo Credit : @samantharuthprabhuoffl/Instagram)
5/7

समंथाने आपली बेडरुमला व्हाइट कलर दिला आहे. तसेच संपूर्ण रुम तिने क्लासी पद्धतीनं डिझाइन केला आहे. (Photo Credit : @samantharuthprabhuoffl/Instagram)
6/7

समंथानं घरातील किचनला एक युनिक लूक दिला आहे. गेल्या वर्षी समंथा नागा चैतन्यच्या वाढदिवसासाठी खास केक तयार करताना दिसून आली होती. (Photo Credit : @samantharuthprabhuoffl/Instagram)
7/7

दरम्यान, 'द फॅमिली मॅन 2'मध्ये समंथा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ही सीरिज 4 जून रोजी रिलीज होणार आहे. चाहते या सीरिजची आतुरतेनं वाट पाहत होते. (Photo Credit : @samantharuthprabhuoffl/Instagram)
Published at : 23 May 2021 01:40 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















