मासिक पाळी हा एक असा मुद्दा आहे, ज्यावर आजही अनेकजण बोलण्यास संकोचतात. फक्त भारतातच नव्हे तर, परदेशातही अद्यापही या मुद्द्यावर अगदी खुलेपणानं बोलणारे सगळे तसे कमीच. मागील काही वर्षांमध्ये मात्र एक सकारात्मक बाब घडत असल्याचं सातत्यानं पाहायला मिळत आहे. ते म्हणजे मासिक पाळी बाबतच्या अनेक जनजागृती करणाऱ्या मोहिमा. कलाकारांचाही या मोहिमांमध्ये मोलाचा सहभाग आहे असं म्हणायला हरकत नाही. मग ती सॅनिटरी पॅडची जाहिरात असो किंवा मासिक पाळीबाबत मोकळेपणानं बोलणं असो.
2/6
सध्या अभिनेत्री राधिका आपटेही याच मुदद्यामुळं चर्चेत आहे. जिथं ती मासित पाळीबाबत बोलताना दिसत आहे. 'पॅडमॅन' या चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या वेळचा हा व्हिडीओ आहे. तिनं सांगितल्यानुसार घरातच डॉक्टर असल्यामुळं मासिक पाळी आपल्यालाही येणार हे ती जाणत होती. तिला यासंदर्भातील पुरेशी माहिती होती.
3/6
शरीरातून होणारा रक्तस्त्राव पाहून आपण खूप जास्त रडलो नाही, असं सांगताना मासिक पाळी आल्यावर आपल्या आईनं एका पार्टीचं आयोजन केल्याचा किस्सा राधिकानं सांगितला. पहिल्यांदाच मासिक पाळी आल्याचा तो दिवस राधिकानं तिचे कुटुंबीय आणि मित्रांसमवेत साजरा केला.
4/6
राधिकानं पुढे सांगितल्यानुसार सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये कोणत्याही दुकाराना सॅनिटरी पॅड खरेदी करण्यासाठी गेलं असताही तिला संकोचलेपणा वाटत होता. आपण हे कसं बरं करणार, असाच प्रश्न तिला सतावत होता. एके दिवशी ती तडक एका दुकानात गेली आणि सॅनिटरी पॅड देण्यासाठी तिनं जोरातच विचारलं. आपल्या मनात असणारी भीती घालवण्यासाठी म्हणून तिनं हा मार्ग निवडला होता.
5/6
राधिकाच्या जीवनातील हा आणि असे इतरही प्रसंगांचे अनुभव तिनं आजवरच्या अनेक मुलाखती आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सर्वांपुढे ठेवले आहेत. तिचा हाच अंदाज पाहता प्रेक्षकांमध्ये ही अभिनेत्री तिच्या या स्वभावामुळंही प्रसिद्ध आहे.