एक्स्प्लोर
धुळ्याच्या लेकीचा बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही डंका, पण मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात?
Actress Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर साऊथमधील एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
Actress Mrunal Thakur
1/10

अभिनेत्री मृणाल ठाकूर मूळची धुळे जिल्ह्यातील असून तिने बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे.
2/10

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर देखील तुफान चर्चेत असते. ती सातत्याने आपल्या चाहत्यांसाठी काहीना काही शेअर करत असते.
3/10

तेलुगू चित्रपटसृष्टीत सध्या अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि अभिनेता सुमंत यांच्यातील कथित प्रेमसंबंधांबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.
4/10

सुमंत यांचे यापूर्वी लग्न झाले होते, मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
5/10

मराठी आणि हिंदी सिनेमातून प्रसिद्ध झालेली मृणाल ठाकूर हिने ‘सीता रामम’ या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.
6/10

सलमानसोबतच्या चित्रपटात मृणालने प्रेक्षकांवर चांगली छाप पाडली. त्यानंतर तिने अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केलं असून, ती लवकरच तामिळ चित्रपटातही पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
7/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘सीता रामम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मृणाल आणि सुमंत एकमेकांच्या जवळ आले. सुमंत या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत होता.
8/10

दोघांमध्ये मैत्री झाली आणि ती मैत्री आता प्रेमात बदलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ते एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याची माहिती समोर आली असून, काही सूत्रांचं म्हणणं आहे की दोघं लग्नाचा विचारही करत आहेत. मात्र यावर अजून अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही.
9/10

सुमंत याने यापूर्वी धनुषच्या ‘वाठी’ या चित्रपटातही भूमिका साकारली होती. त्याचे लग्न यापूर्वी अभिनेत्री कीर्ती रेड्डी हिच्याशी झाले होते, परंतु नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
10/10

मृणाल आणि सुमंत यांचा एक फोटो अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेला अधिक उधाण आले आहे.
Published at : 18 Jul 2025 02:53 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























