एक्स्प्लोर

Ashok Saraf : जाणून घेऊयात या दिग्गज अभिनेत्या कारकिर्दीचा प्रवास!

जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

(photo:nivedita_ashok_saraf/ig)

1/12
आपल्या बहारदार अभिनयाने चित्रपटांचा पडदा, नाटकांचं व्यासपीठ, टीव्हीची स्क्रीन आणि बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेला सुवर्णझळाळी बहाल करणाऱ्या अशोक सराफ (Ashok Saraf) यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) जाहीर झालाय. (photo:nivedita_ashok_saraf/ig)

2/12
कधी विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर खुदकन् हसू, कधी आशयघन अभिनयाने डोळ्यांत टचकन् पाणी आणणारे,तर कधी कसदार अभिनयाने प्रेक्षकांना अंतर्मुख करणारे अशी अशोक सराफ यांचं वर्णन केलं जातं.(photo:nivedita_ashok_saraf/ig)

3/12
180 मराठी सिनेमे, 52 हिंदी सिनेमे, 12 नाटकं आणि त्याचे हजारो प्रयोग, 10 टिव्ही मालिका आणि कमावलेले अगणित चाहते. अशोक सराफ यांचा प्रवास अकड्यांमध्ये कोंडणं अशक्य आहे. (photo:nivedita_ashok_saraf/ig)

4/12
पण याच प्रवासाचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य सरकारनं अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केलाय.भन्नाट टायमिंग, भूमिकेतलं वैविध्य आणि सहजता या जोरावर अशोक सराफ यांनी रंगमंच, चित्रपट आणि मालिका या तिन्हींमध्ये आपला ठसा उमटवला.अशा या दिग्गज अभिनेत्या कारकिर्दीचा प्रवास जाणून घेऊयात. (photo:nivedita_ashok_saraf/ig)

5/12
अशोक सराफ हे मूळचे बेळगावचे असले तरीही त्यांचा जन्म मुंबईतच झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. सुरुवातीपासूनच मामांना अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी मामांनी अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरु केला जो आजही अविरत सुरु आहे.

6/12
त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारे व्यावसायिक रंभूमीवर पाऊल ठेवलं. गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. (photo:nivedita_ashok_saraf/ig)

7/12
त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. (photo:nivedita_ashok_saraf/ig)

8/12
सुरुवातीला अशोक मामांच्या वडिलांचा त्यांच्या अभिनयाला विरोध नसला तरीही त्यांनी बँकेत नोकरी करावी अशी त्यांच्या वडिलांच्या इच्छा करावी. त्यानुसार अशोकमामांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केलीही. त्याचसोबत ते थिएटर देखील करत होते. (photo:nivedita_ashok_saraf/ig)

9/12
पण त्यांच्या अभिनयाच्या ओढीने त्यांनी सगळं बाजूला सारत त्यांच्या अभिनयाचा प्रवास अखंड सुरु ठेवला. वयाची पंचाहात्तरी पार केल्यावरही रंगमंचावर व्हॅक्यूम क्लीनरसारख्या नाटकातून अशोक सराफ यांच्या अभिनयाची मोहिनी कायम राहिलीय.(photo:nivedita_ashok_saraf/ig)

10/12
दादा कोंडकेंसोबत पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे अभिनयाचे विविध पैलू त्यांनी उलगडले. 'वजीर'सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा त्यांनी निभावली. ऐंशीच्या दशकात लक्ष्यामामा आणि अशोकमामा या जोडीने महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि कलेच्या माध्यमातून त्यांच्या मनोजरंजनाची सेवा देखील केली. (photo:nivedita_ashok_saraf/ig)

11/12
अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, एक गाडी बाकी अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन नाही केलं तर मराठी चित्रपटाचा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.(photo:nivedita_ashok_saraf/ig)

12/12
अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा यांसारख्या कलाकृती साकार झाल्या.(photo:nivedita_ashok_saraf/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget