एक्स्प्लोर
Aai Tuljabhawani Colours Marathi Serial Track: आई राजा उदो उदो! बाल जगदंबासमोर 'माया' उभी ठाकणार PHOTOs
Aai Tuljabhawani Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील आई तुळजाभवानी (Aai Tuljabhawani) मालिकेत न भूतों न भविष्यती असा अभूतपूर्व असा असुरी शक्ति विरुद्ध दैवी शक्तीचा सामना रंगणार आहे.
Aai Tuljabhawani Colours Marathi Serial Track
1/8

महिषासूर षड्रिपूंना जागृत करणार आहे, मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अत्याधुनिक अॅनिमेशनचा वापर करून ही षड्रिपूची दृश्य साकारली जाणार आहेत.
2/8

महिषासुराच्या मायावी खेळीनुसार मनाच्या सहा शत्रूंपैकी एक 'माया' शक्तिशाली रूपात प्रकट होणार आहे.
3/8

देव असो अथवा मानव, कुठलाही थेट हल्ला न करता त्याच्या मनाचा ताबा मिळवून सर्वनाश अटळ करणाऱ्या लोभ, क्रोध, मोह, मत्सर, मद व माया या षड्रिपूंच्या प्रभावाने महिषासुर अधिक बलशाली होणार आहे.
4/8

यामुळे बाल जगदंबेच्या मार्गातील अडथळे अधिकच वाढताना दिसणार आहेत, या प्रकरणात 'माया'चं आगमन एक धक्कादायक वळण घेऊन येणार आहे.
5/8

ही 'माया' केवळ षड्रिपूंतील एक नसून ती संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे तिच्यापासून निर्माण होणारा धोका मोठा आहे.
6/8

बाल जगदंबेच्या लीलांचा सामना करण्यासाठी आता महिषासूर आणि त्याच्या षड्रिपूंच्या रूपाने संकटांचा महापूर उभा ठाकणार आहे.
7/8

बाल जगदंबासमोर 'माया' उभी ठाकल्यामुळे दैवी शक्ति आणि असुरी शक्तीचा रंगणारा घनघोर सामना 'आई तुळजाभवानी'च्या दैवी लीलांमुळे आगळावेगळा ठरणार आहे.
8/8

आता पुढे काय होणार? हे पाहण्यासाठी 'आई तुळजाभवानी' मालिकेचे पुढचे भाग पाहावे लागतील.
Published at : 12 Jun 2025 12:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























