एक्स्प्लोर
आईराजा उदो, उदो! षडरिपूचा करण्या संहार, जगदंबाला महादेव देणार योगविद्येचं ज्ञान!
Aai Tuljabhawani Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Aai Tuljabhawani Colours Marathi Serial Track
1/9

एक अद्भुत असा आध्यात्मिक अध्याय, जिथे प्रत्यक्ष भगवांन महादेव, जगदंबेला शिकवणार आहेत, योगविद्येचं गूढ आणि सामर्थ्य.
2/9

ही कथा आहे जगदंबेच्या त्या प्रवासाची, जिथे ती षड्रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांचा संहार करण्यासाठी योगविद्येचं शस्त्र आत्मसात करते.
3/9

एका शांत आणि दिव्य कुटीत, महादेव जगदंबेला योगाचे बारकावे शिकवायला सुरुवात करतात. ते सांगतात की, योगविद्येकडे केवळ दिव्यदृष्टी मिळवण्यासाठी पाहू नये, तर ती अंतर्मनातील षड्रिपू शांत करण्यासाठी उपयोगात आणावी. श्वास आणि एकाग्रता हे या विद्येचं मर्म आहे, असं ते जगदंबेला समजावतात.
4/9

महादेव तिला पद्मासन बसण्याची अचूक पद्धत शिकवतात आणि श्वासोच्छ्वासाच्या एकाग्रतेतून जगदंबा ध्यानात जाते आणि तिच्या भोवतालचं वातावरण बदलतं.
5/9

तिच्या एकाग्रतेच्या जोरावर पाणी, आग, माती, वायु आणि आकाश ही पंचमहाभूत तिच्या ताब्यात येतात. पण, एका क्षणी ती बालसुलभ स्वभावाप्रमाणे हसते आणि एकाग्रता भंग पावते.
6/9

याच प्रवासात महादेव तिला दृष्टीची ताकद सांगतात जी ब्रह्मांडाचा ठाव घेऊ शकते किंवा त्याला भस्म करू शकते.
7/9

जगदंबेची स्थिर नजर दिव्याच्या ज्योतीत बदल घडवते आणि एक न भूतो न भविष्यती अद्भुत दृश्य निर्माण होते. जेव्हा जगदंबा पंचमहाभूतांवर प्रभुत्व मिळवते.
8/9

तिच्या कपाळावर तुळजाभवानीचा मळवट प्रकट होतं, तिच्या भोवती तेजाची प्रभा पसरते आणि शिष्येच्या या यशाने महादेव आनंदीत होतात , पण काही क्षणांसाठीच त्यांचे हास्य टिकते, हे असे का घडते आणि त्यापुढचे नाट्य काय घडणार याची उत्तरं या महाएपिसोडमध्ये पाहायाला मिळतील.
9/9

महादेवांनी दिलेल्या योगविद्येच्या ज्ञानाच्या साहाय्याने षड्रिपू मदचा संहार जगदंबा आता कशी करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Published at : 13 Aug 2025 02:00 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
























