एक्स्प्लोर
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: 16 पैकी 7 आमदार झाले खासदार; 9 जणांचं स्वप्न भंगलं...; राज्यात कोणा-कोणाला यश मिळालं?, पाहा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या 16 आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढविली.

maharashtra loksabha result 2024
1/10

लोकसभा 2024 च्या निवडणूकीत (Lok Sabha Election Result 2024) महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा मिळवत दमदार यश मिळवले. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानवे लागले. राज्यात काँग्रेसला सर्वाधिका 13 जागा मिळाल्या. तर उद्धव ठाकरेंना 9 आणि शरद पवार यांच्या पक्षाला 8 जागा मिळाल्या. भाजपला 9, शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले.
2/10

राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या 16 आमदारांनी लोकसभेची निवडणूक लढविली, पण त्यातील 7 जण जिंकले आणि 9 जणांचा पराभव झाला. कोणाचा विजय आणि पराभव झाला, जाणून घ्या...
3/10

प्रतिभा धानोरकर- प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या आमदार होत्या. त्यांनी भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून खासदारकी मिळावली आहे.
4/10

बळवंत वानखेडे- बळवंत वानखेडे हे काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव करत अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदारकी मिळवली.
5/10

रवींद्र वायकर- रवींद्र वायकर शिवसेना शिंदे गटाचे आमदार होते. त्यांनी ठाकरे गटाच्या अमोक किर्तीकर यांचा पराभव करत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदारकी मिळवली आहे.
6/10

वर्षा गायकवाड- वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या आमदार होत्या. त्यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्वल निकम यांचा पराभव केला.
7/10

संदीपान भुमरे- संदीपान भुमरे शिवसेना शिंदे गटाचे आमदार होते. त्यांनी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा पराभव केला.
8/10

नीलेश लंके- नीलेश लंके हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार होते. त्यांनी भाजपच्या सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला आणि खासदारकी मिळवली.
9/10

प्रणिती शिंदे- प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या आमदार होत्या. त्यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा सोलापूर मतदारसंघातून पराभव केला.
10/10

पराभूत झालेल्या आमदारांची नावं- राम सातपुते, यामिनी जाधव, मिहीर कोटेचा, शशिकांत शिंदे, महादेव जानकर, राजेश पाटील, विकास ठाकरे, राजू पारवे, सुधीर मुनगंटीवार.
Published at : 05 Jun 2024 09:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
