एक्स्प्लोर
TCS Q4 Result : टीसीएसचा चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर, नफा घटला, महसूल वाढला, 30 रुपये लाभांश जाहीर
TCS Q4 Result : टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचे जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. कंपनीचा फायदा 2 टक्क्यांनी घटला तर महसूल वाढला आहे.
टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस
1/5

देशातील सर्वात मोठी आयची कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसनं जानेवारी-मार्च 2025 च्या तिमाहीतील आकडे आणि आर्थिक वर्ष 2024-25 ची आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 1.67 टक्क्यांनी घसरुन 12293 कोटी रुपये झाला आहे.2023-24 च्या आर्थिक तिमाहीत कंपनीचा नफा 12502 कोटी होता. तर, शेअरधारकांसाठी मार्च 2025 च्या तिमाहीत नफा 12224 कोटी इतका आहे.
2/5

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचा ऑपरेशन्सच्या कन्सोलिडेटेड बेसिसवर महसूल 5 टक्क्यांनी वाढून 64479 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी महसूल 61237 कोटी होती. या तिमाहीत कंपनीचा खर्च 49105 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील खर्च 45545 कोटी इतका होता.
Published at : 10 Apr 2025 04:56 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























