एक्स्प्लोर
Closing Bell: शेअर बाजारात तेजी तरीही गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान
Share Market Closing Bell: आज शेअर बाजाराने नवा उच्चांक गाठला असला तरी नफावसुलीने बाजारात घसरण दिसून आली.
Closing Bell: शेअर बाजारात तेजी तरीही गुंतवणूकदारांचे 5 लाख कोटींचे नुकसान
1/10

गुरुवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने प्रथमच 66,000 अंकांचा टप्पा गाठला.
2/10

मात्र हा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर बाजाराचा निर्देशांक दिवसभरातील उच्चांकावरून घसरला. सेन्सेक्स निर्देशांक दिवसभरातील उच्चांकावरून 600 अंकांनी खाली घसरला. तर, निफ्टीतही 180 अंकांची घसरण पाहायला मिळाली.
3/10

गुरुवारी, सकाळच्या सत्रात व्यवहारात सेन्सेक्स 770 आणि निफ्टी 183 अंकांच्या उसळीसह व्यवहार करत होता.
4/10

आज दिवसभरातील व्यवहाराअंती बीएसईचा निर्देशांक सेन्सेक्स 165 अंकांच्या उसळीसह 65,558 वर बंद झाला.
5/10

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकांच्या तेजीसह 19,413 अंकांवर बंद झाला.
6/10

आज दिवसभरातील मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये नफावसुलीने घसरण दिसून आली.
7/10

ऑटो, एफएमसीजी, फार्मा, एनर्जी, मीडिया, इन्फ्रा, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टर आदी स्टॉक्स घसरणाीसह बंद झाले.
8/10

आयटी, बँकिंग, मेटल्स, रिअल इस्टेट सेक्टरमधील शेअर दरात तेजी दिसून आली. टीसीएसच्या सकारात्मक तिमाही निकालामुळे आयटी इंडेक्स 500 अंकांनी वधारला.
9/10

रिलायन्स इंडस्ट्रीजसह मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला.
10/10

याच्या परिणामी मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 295.96 लाख कोटी इतके झाले. बुधवारच्या तुलनेत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.65 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.
Published at : 13 Jul 2023 04:52 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























