एक्स्प्लोर
Personal Finance : PPF, म्युच्यअल फंड किंवा FD मध्ये गुंतवणुक करताय? किती दिवसात दुप्पट नफा मिळेल, समीकरण जाणून घ्या
Investment Plan : जर एखाद्याने शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंडद्वारे तुम्हाला दीर्घकाळात सुमारे 12-15 टक्के परतावा मिळू शकतो.

Personal Finance
1/9

Investment Plan : जर एखाद्याने शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंडद्वारे तुम्हाला दीर्घकाळात सुमारे 12-15 टक्के परतावा मिळू शकतो. (Image Source : istock)
2/9

प्रत्येकजण भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतो. गुंतवणूकदार त्यांच्या सोयी आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार बँक एफडी, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात. (Image Source : istock)
3/9

जर तुम्ही PPF, म्युच्युअल फंड किंवा बँक मुदत ठेवीमध्येही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला माहिती आहे की, तुमचे पैसे किती दिवसांत दुप्पट होतील. नसेल तर हे वाचा. (Image Source : istock)
4/9

आर्थिक नियोजनात वापरल्या जाणार्या नियम 72 बद्दल सविस्तर जाणून घ्या. हा नियम वापरून तुम्ही किती दिवसांत तुमचे गुंतवणुकीचे पैसे दुप्पट होतील याची गणना सहज करू शकता. (Image Source : istock)
5/9

नियम 72 तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील म्हणजेच तुमची गुंतवणूक दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागेल, याचा तुम्हाला अंदाज येईल. (Image Source : istock)
6/9

हे सूत्र वापरण्यासाठी, व्याज दर 72 ने भागला जातो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला बँक एफडीमध्ये 6 टक्के परतावा मिळत असेल तर 6 ला 72 ने भागा. म्हणजे 72/6 = 12, म्हणजे बँक FD मध्ये केलेली गुंतवणूक 12 वर्षांत दुप्पट होईल. (Image Source : istock)
7/9

हा नियम 6 ते 10 टक्के व्याज दरात योग्य गणना देतो. यामुळे तुमच्या व्याजाच्या गणनेमध्ये कमी-जास्त फरक पडू शकतो. (Image Source : istock)
8/9

सध्या तुम्हाला PPF ठेवींवर 7.1 टक्के व्याज मिळते. एप्रिल 2020 पासून पीपीएफवरील व्याजदरांमध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही. PPF वर 7.1 टक्क्यांसह सह तुमचे पैसे दुप्पट होण्यासाठी सुमारे 10 वर्षे लागतील. (Image Source : istock)
9/9

आर्थिक तज्ज्ञांच्या मते, योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंड दीर्घकाळात सुमारे 12 ते15 टक्के परतावा देऊ शकतात. त्यामुळे MF मध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक सहा वर्षांत दुप्पट होईल. (Image Source : istock)
Published at : 26 Sep 2023 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
