एक्स्प्लोर
LPG सिलेंडरवर उगाच नसतात हे आकडे; जाणून घ्या याचा अर्थ
LPG Cylinder: तुमच्या घरातही एलपीजी सिलिंडर असेल तर तुम्ही हा विशेष क्रमांक तपासावा, जो तुम्हाला एखाद्या अपघातापासून वाचवू शकतो.

LPG सिलेंडरवर उगाच नसतात हे आकडे; जाणून घ्या याचा अर्थ
1/10

बहुतेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी एलपीजी सिलिंडरचा वापर केला जातो. सिलिंडर घेताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
2/10

बहुतांशी जण एलपीजी सिलिंडरचे वजन आणि सिलेंडर सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतात. परंतु, सिलेंडर घेण्याआधी विशिष्ट प्रकारचे कोड देखील तपासले पाहिजे.
3/10

गॅस सिलेंडरच्या वरच्या बाजूला एक विशेष कोड लिहिलेला असतो.
4/10

हा कोड अक्षरे आणि संख्या अशा दोन्ही स्वरूपात नमूद केलेला आहे. हा कोड सिलिंडरच्या एक्सपायरी डेटबद्दल सांगतो.
5/10

सिलिंडरवर लिहिलेले A, B, C आणि D म्हणजे वर्षाचे 12 महिने, तर हा सिलेंडर किती काळ वैध आहे हे क्रमांक सांगतो.
6/10

सिलेंडर वर्षाचे 12 महिने चार भागात विभागले आहेत. A म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. तर B म्हणजे एप्रिल, मे आणि जून. C म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तसेच, D म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना.
7/10

उदाहरणार्थ, जर समजा एका सिलेंडरवर A 22 लिहिलेले असेल तर याचा अर्थ या सिलेंडरची जानेवारी, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये एक्सपायरी आहे. 22 म्हणजे 2022 मध्ये ही एक्सपायरी आहे.
8/10

एक्स्पायरी डेटनंतरही तुम्ही सिलिंडर वापरत असाल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते
9/10

काही अनुचित प्रकार घडण्याचा धोका असू शकतो.
10/10

सिलेंडर घेताना हा कोड तपासला पाहिजे. यासोबतच सिलिंडरची चाचणी आणि वजनही तपासावे.
Published at : 18 Jun 2023 09:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
