एक्स्प्लोर
आधी प्रवास करा, मग तिकिटाचे पैसे भरा; IRCTC कडून प्रवाशांना गिफ्ट
आयआरसीटीसीने प्रवाशांसाठी नवीन योजना लागू केली आहे. यामध्ये प्रवास आधी करून तिकीटाचे पैसे नंतर भरता येणार आहे. सहा महिन्याच्या कालावधीत पैसे भरता येणार आहे.

IRCTC: आधी प्रवास करा, मग तिकिटाचे पैसे भरा; IRCTC कडून प्रवाशांना गिफ्ट
1/10

प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्यात येतात. या विशेष ट्रेनमधून प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने नवीन सुविधा सुरू केली आहे.
2/10

या नव्या खास सुविधेनुसार, प्रवाशांना एकही पैसा न देता तिकीट बुक करता येणार आहे. या प्रवासाचे पैसे नंतर देता येणार आहे.
3/10

'ट्रॅव्हल नाऊ अॅण्ड पे लेटर' अशा या नव्या खास सुविधेचे नाव आहे.
4/10

ही सुविधा IRCTC च्या रेल कनेक्ट अॅपवरही उपलब्ध आहे.
5/10

'Travel Now Pay Later' ची सुविधा देण्यासाठी IRCTC ने CASHe सोबत भागिदारी केली आहे.
6/10

अनेकदा लोकांना आपात्कालीन परिस्थितीत तिकिट बुक करावी लागते. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसतात. अशा स्थितीत 'Travel Now Pay Later' चा वापर करता येईल.
7/10

या नव्या सुविधेमुळे प्रवासी तिकीट बुक करू शकतात. तुम्ही EMI चा पर्याय निवडून तिकीट बुक शकता.
8/10

CASHe च्या माध्यमातून 'Travel Now Pay Later' साठी साधारण आणि तात्काळ तिकीट बुक करू शकता.
9/10

तिकीटासाठीची रक्कम ही तीन ते सहा महिन्याच्या कालावधीत हप्त्याने भरू शकता.
10/10

या सु्विधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्युमेंटची आवश्यकता नाही.
Published at : 19 Oct 2022 09:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
